Corona Cases : लहान मुलांना कोरोनाच्या नव्या लाटेचा मोठा धोका, जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात…
पुन्हा एकदा देशामध्ये कोरोना (Corona) आपले पाय पसरवताना दिसतो आहे. कारण गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 1, 247 नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4,30,45,527 इतकी झाली आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या रूग्णांमध्ये (Patient) मोठी घट झाली होती.
मुंबई : पुन्हा एकदा देशामध्ये कोरोना (Corona) आपले पाय पसरवताना दिसतो आहे. कारण गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 1, 247 नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4,30,45,527 इतकी झाली आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या रूग्णांमध्ये (Patient) मोठी घट झाली होती. त्यामुळे राज्यासह देशामधील कोरोनाच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली होती. मात्र, आता येणारी आकडेवारी धडकी बसविणारीच आहे. या चौथ्या लाटेचा सर्वाधिक धोका (Danger) हा लहान मुलांना असल्याचे बोलले जात आहे.
शाळकरी मुलांना कोरोनाचा संसर्ग
दिल्लीमधील अनेक शाळांमध्ये मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहेत, यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या दोन वर्षांपासून शाळा आणि काॅलेज पूर्णपणे बंद होती. मुलांचे आॅनलाईन पध्दतीने शिक्षण सुरू होते. मात्र, कोरोनाच्या केसेस कमी झाल्यानंतर शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये आता मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्यामुळे धोक्याची घंटा निर्माण झाली आहे. ही चिंतेची बाब आहे, कारण यावेळी मोठ्या संख्येने शाळकरी मुलांना संसर्ग होत आहे. दिल्ली येथील एनसीआरमधील अनेक शाळांमध्ये मुले कोरोना संक्रमित आढळून आली आहेत. मात्र, आता शाळा बंद करणे हा उपाय नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
24 तासांमध्ये 33 मुले कोरोना बाधित
फक्त दिल्लीच नव्हेतर नोएडा आणि गाझियाबादमधील अनेक शाळांमध्ये मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. नोएडामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 33 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मात्र, यावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, काळजी करण्यासारखे काही नाही. कारण ज्या मुलांना संसर्ग होत आहे त्यांची लक्षणे अतिशय सौम्य आहेत आणि ते लवकर बरे होत आहेत. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणतात की, आता घाबरून जाण्याची गरज नाही. यासंदर्भात आजतकने सविस्तर रिपोर्ट दिला आहे.
संबंधित बातम्या :
ब्रेकिंग! पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढीनं डोकं वर काढलं, गेल्या 24 तासांतली आकडेवारी बघाच
तुम्हीही भेसळयुक्त चहापत्ती घेत नाहीयेत ना? भेसळयुक्त चहापत्ती ओळखण्यासाठी ही सोपी पध्दत जाणून घ्या!