धक्कादायक…! भारतातील लाखो मुले टाइप 1 मधुमेहाने ग्रस्त, थक्क करणारी आकडेवारी आली पुढे
आयडीएफने नुकताच एक अहवाल प्रसिध्द केला आहे. त्यानुसार भारतामध्ये नव्हेतर संपूर्ण जगामध्ये टाईप 1 मधुमेहाच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये धोक्याची घंटा म्हणजे यासंख्येमध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे. संपूर्ण जगामध्ये 12.11 लाखांहून अधिक लहान मुले आणि तरूण मुले-मुली टाइप 1 मधुमेहाने ग्रस्त आहेत. 12.11 लाखामध्ये निम्म्याहून अधिक मुलेही 15 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत.
मुंबई : भारतामध्ये (India) मधुमेही रूग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसते आहे. मात्र, मधुमेह साधारण 40 वर्ष वयोगटानंतर होतो. नुकताच एक धक्कादायक आकडेवारी पुढे आलीये. त्यानुसार भारतामध्ये दररोज 65 मुलांना मधुमेह (Diabetes) होतो आहे, असे म्हटंले गेले आहे आणि ही एक अतिशय गंभीर बाब आहे. भारतात टाइप 1 मधुमेहाची समस्या किती भयंकर रूप घेते आहे हेच या आकडेवारीवरून पुढे येत आहे. इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन (आयडीएफ) च्या मते, गेल्या वर्षी जगभरात मधुमेहामुळे 6.7 दशलक्षाहून अधिक मृत्यू (Death) मधुमेहामुळे झाले होते. हे मृत्यू 20 ते 79 वयोगटातील लोकांचे झाले हे वास्तव्य आहे.
आयडीएफच्या अहवालामध्ये आली आकडेवारी पुढे
आयडीएफने नुकताच एक अहवाल प्रसिध्द केला आहे. त्यानुसार भारतामध्ये नव्हेतर संपूर्ण जगामध्ये टाईप 1 मधुमेहाच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये धोक्याची घंटा म्हणजे यासंख्येमध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे. संपूर्ण जगामध्ये 12.11 लाखांहून अधिक लहान मुले आणि तरूण मुले-मुली टाइप 1 मधुमेहाने ग्रस्त आहेत. 12.11 लाखामध्ये निम्म्याहून अधिक मुलेही 15 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत. भारतात 2.29 लाखांहून अधिक मुले आणि तरूण टाइप 1 मधुमेहग्रस्त आहेत. मधुमेहाचे दोन प्रकार आहेत. टाइप 1 आणि टाइप 2. टाइप 1 मधुमेह लहान मुलांना होतो. या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला जगण्यासाठी इन्सुलिनचे इंजेक्शन आवश्यक असते. टाइप 2 ग्रस्त लोकांवर औषधे आणि थेरपीद्वारे उपचार केले जाऊ शकतात, परंतु त्यांना इन्सुलिनचे इंजेक्शन देखील आवश्यक आहे.
भारतामध्ये टाइप 1 मधुमेहाचे 24 हजारांहून अधिक नवीन रुग्ण
भारतात टाइप 1 मधुमेहाचे 24 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. म्हणजेच दररोज 65 हून अधिक मुले टाइप 1 मधुमेहाचे बळी होत आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) टाइप 1 मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. भारतामध्ये 74 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. 2045 पर्यंत मधुमेही रुग्णांची संख्या 12.50 दशलक्षांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. म्हणजेच भारत आता मधुमेहाच्या रूग्णांची राजधानी होण्याच्या उंबरड्यावर आहे.
शरीरामध्ये इन्सुलिन होत नाही
भारतामधील 2.29 लाखांहून अधिक मधुमेही हे 20 वर्षांखालील आहेत. ही संख्या जगात सर्वा Type 1 diabetesत जास्त आहे. यानंतर अमेरिका आणि ब्राझीलचा नंबर येतो. 2021 मध्ये जगभरात मधुमेहा Type 1 diabetesमुळे 67 लाख मृत्यू झाले आहेत. ज्यामध्ये चीनमध्ये सर्वाधिक 1.4 दशलक्ष मृत्यू झाले. टाइप 1 मधुमेहामुळे आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन तयार करणे थांबवते. ज्या मुलांना मधुमेह होतो त्यांना लठ्ठपणाची समस्या अधिक असते. टाईप 1 मधुमेह असलेल्या लोकांना त्यांच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण राखण्यासाठी दररोज इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते. वारंवार लघवीला जाणे, वजन झपाट्याने कमी होणे, ही सर्व प्रकार 1 मधुमेहाची आहेत. यासंदर्भात आजतकने सविस्तर रिपोर्ट दिला आहे.