Healthy drinks | हे हेल्दी ड्रिंक्स प्या आणि उष्माघातापासून चार हात दूर राहा, वाचा अधिक!

बाराही महिने नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. एक ग्लास नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नारळाचे पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यामध्ये पोटॅशियम भरपूर असते, हे खनिज रक्तदाब नियंत्रणात ठेवते. नारळ पाणी तुमच्या किडनीसाठी फायदेशीर आहे, ते किडनी स्टोनची समस्या दूर करण्यास मदत करते.

Healthy drinks | हे हेल्दी ड्रिंक्स प्या आणि उष्माघातापासून चार हात दूर राहा, वाचा अधिक!
Image Credit source: unsplash.com
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 11:59 AM

मुंबई : उन्हाळ्याच्या (Summer) हंगामात त्वचा, केस आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. उष्णता आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. या हंगामात उष्माघातापासून स्वत: ला वाचवणे खूप महत्वाचे होते. या हंगामात उष्माघातापासून (Heatstroke) वाचण्यासाठी शक्यतो दुपारच्या वेळी घराच्या बाहेर जाणे टाळाच. तसेच या हंगामात निरोगी राहण्यासाठी सकस आणि चांगला आहार घेणेही तितकेच महत्वाचे आहे. उष्णता आपल्यापासून चार हात दूर ठेवण्यासाठी काही हेल्दी ड्रिंक्सचे सेवन करायला हवे. हे ड्रिंक्स (Drinks) तुम्हाला निरोगी ठेवण्यास आणि उष्माघातापासून वाचवण्यास मदत करतील. हे ड्रिंक्स नेमके कोणते आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

नारळ पाणी

बाराही महिने नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. एक ग्लास नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नारळाचे पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यामध्ये पोटॅशियम भरपूर असते, हे खनिज रक्तदाब नियंत्रणात ठेवते. नारळ पाणी तुमच्या किडनीसाठी फायदेशीर आहे, ते किडनी स्टोनची समस्या दूर करण्यास मदत करते. नारळ पाणी आपल्या शरीराला लगेचच ऊर्जा देण्याचेही काम करते. दुपारच्या वेळी नारळाच्या पाण्याचे सेवन करा.

लिंबू पाणी

लिंबू पाणी प्यायला जवळपास सर्वांनाच आवडते. हे एक लोकप्रिय आरोग्यदायी पेय आहे जे उन्हाळ्यात सेवन केले जाते. त्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच हे हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा आणि कर्करोगापासून संरक्षण करण्यास मदत करते. यामुळे संधिवाताची समस्या दूर होते. शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते. स्वत: ला रोग्यांपासून दूर ठेवण्यासाठी या हंगामात नक्कीच लिंबू पाण्याचा आहारात समावेश करा.

ताक

उन्हाळ्यात हायड्रेट ठेवण्यासाठी ताक हे एक आरोग्यदायी पेय आहे. त्यात लैक्टिक ऍसिड असते. यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे तुमची हाडे मजबूत राहतात. यामध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया पचनसंस्था निरोगी ठेवतात. विशेष म्हणजे घरी ताजेताजे ताक करण्यास अजिबात जास्त वेळ लागत नाही. मात्र, बाजारातून ताक खरेदी करण्यापेक्षा घरी ताक करून पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.