हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी अवलंबवा ‘या’ ट्रिक्स, झपाट्याने होईल वजन कमी

थंडीच्या दिवसात बरेच लोक आळसामुळे व्यायाम करणे टाळतात, त्यामुळे वजन वाढायला सुरूवात होते. मात्र काही ट्रिक्स फॉलो करून तुम्ही वजन कमी करू शकता.

हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी अवलंबवा 'या' ट्रिक्स, झपाट्याने होईल वजन कमी
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 3:19 PM

नवी दिल्ली – वजन कमी (weight loss) करण्यासाठी काही लोक वर्षभर प्रयत्न करत असतात. पण जसजशी थंडी वाढत जाते तसतसे लोक सुस्त होतात. घरातून बाहेर पडण्यासाठी शंभर वेळा विचार केला जातो. उद्या जिमला जाईन, परवा जाऊ असा विचार करत राहता पण तेवढ्या काळात वजन वाढतच राहते. थंडीच्या दिवसात बरेच लोक आळसामुळे व्यायाम करणे (exercise) टाळतात, त्यामुळे वजन वाढायला सुरूवात होते. घरात राहिल्यावर खाण्यापिण्याच्या सवयीही बदलतात. त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवणे कठीण होते. पण काही ट्रिक्स फॉलो करून तुम्ही थंडीच्या दिवसातही वजन नियंत्रणात (Winter weight loss tips) ठेऊ शकता.

हिवाळ्यात वजन कमी करण्याचे उपाय –

– थंडीच्या काळात दिवसभर घरी बसू नये. वजन वाढत असेल तर घराबाहेर पडा. सकाळी थंडी अधिक असते, त्यामुळे तेव्हा फिरायला जाऊ नका. पण थंडी थोडी कमी झाली की, फेरफटका मारायला आवर्जून बाहेर पडा. थंडीच्या ऋतूत दिवसा किंवा संध्याकाळी 4 अथवा 5 वाजता चालणं उत्तम. यावेळी ऊनही असते. थंडीच्या दिवसात गार वाटल्याने देखील शरीरातील चरबी, कॅलरी देखील कमी होते, हे तुम्हाला माहीत आहे का? थंडीच्या दिवसातही कॅलरीज बर्न करायच्या असतील, तर घराबाहेर पडून चालणं गरजेचं आहे.

हे सुद्धा वाचा

– हिवाळ्यात लोक घरी आळसात बसून खाण्या-पिण्याची वेळही पाळत नाहीत. काही लोक जास्त खायला लागतात. मात्र थंड हवामानातही शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल, तर खाण्यापिण्याची सवय सुधारणे गरजेचे आहे. त्यासाठी हेल्दी फायबरयुक्त पदार्थांचं सेवन करावं. तसेच वेळेवर जेवण्याची सवय लावावी. फायबरमुळे वजन लवकर वाढत नाही, कारण त्यामुळे आपलं पोट खूप वेळ भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे आपला कॅलरीयुक्त, अनहेल्दी पदार्थ खाण्यापासून बचाव होतो व वजन नियंत्रणात राहते.

– काही लोक हिवाळ्याच्या दिवसात गरम पाणी पितात. तुम्हालाही ही सवय असेल तर ती बदला. वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर थंडीच्या मोसमातही साधं पाणी प्यावं. काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की शरीराच्या तापमानापेक्षा जास्त थंड पदार्थांचे सेवन केल्याने शरीराला ते गरम करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. या काळात शरीरातून भरपूर कॅलरीज बर्न होतात. जर तुम्हाला गार पाणी पिणे शक्य नसेल तर साधं पाणी प्यावे. यामुळे सर्दी-खोकल्यापासूनही तुमचे संरक्षण होईल.

– हिवाळ्याच्या दिवसांत वजन कमी करायचं असेल तर हर्बल टी तसेच ब्लॅक कॉफीचे सेवन करावे. काही महिने दुधाचा चहा पिऊ नका. हर्बल टी आणि ब्लॅक कॉफीमुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. हर्बल टी मध्ये ग्रीन टी, लॉन्ग टी, हिबिस्कस टी, तसेच ब्लॅक कॉफी यांच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. थंडीच्या ऋतूत हेल्दी ड्रिंक्स जरूर प्यावेत. त्यामुळे शरीराचे मेटाबॉलिज्म वाढते, तसेच फॅट बर्न होण्यास मदत होते.

(टीप- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.