Health Tips : ‘या’ 5 सवयी किडनीसाठी हानिकारक, वाचा याबद्दल सविस्तर!
किडनी हा आपल्या शरीराचा एक आवश्यक भाग आहे. हे आपल्या शरीरातून अतिरिक्त द्रव, विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. याशिवाय, हे शरीरातील पाणी, मीठ, खनिजे संतुलित प्रमाणात ठेवण्यास मदत करते. त्याशिवाय शरीराच्या नसा, पेशी आणि स्नायू व्यवस्थित काम करू शकत नाहीत.
मुंबई : किडनी हा आपल्या शरीराचा एक आवश्यक भाग आहे. हे आपल्या शरीरातून अतिरिक्त द्रव, विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. याशिवाय, हे शरीरातील पाणी, मीठ, खनिजे संतुलित प्रमाणात ठेवण्यास मदत करते. त्याशिवाय शरीराच्या नसा, पेशी आणि स्नायू व्यवस्थित काम करू शकत नाहीत. किडनीवर परिणाम झाल्यास अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी किडनी निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
1. पेनकिलरचा अतिवापर
बऱ्याच लोकांना सवय असते की, थोड्या वेदना झाल्या की पेनकिलर खायची. ही वेदनाशामक औषधे घेतल्याने वेदना कमी होतात. पण ते किडनीसाठी हानिकारक आहे. विशेषत: जर तुम्हाला आधीच किडनीशी संबंधित कोणताही आजार असेल. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरही नेहमी पेनकिलर घ्या.
2. जेवणात जास्त मीठ खाणे
जर तुमच्या आहारात जास्त प्रमाणात मीठ असेल तर रक्तदाबाची समस्या वाढू शकते. जेवणात मीठापेक्षा जास्त मसाले आणि औषधी वनस्पती वापरा. जर तुम्ही त्यांचा वापर सुरू केलात, तर तुम्ही मिठाचे सेवन कमी कराल.
3. प्रक्रिया केलेले अन्न
प्रक्रिया केलेले अन्न सोडियम आणि फॉस्फरसमध्ये समृद्ध असते. जर तुम्हाला किडनीशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही पॅकेज केलेले अन्न खाणे टाळावे. प्रक्रिया केलेले अन्न जास्त प्रमाणात घेतल्याने किडनी आणि हाडे खराब होतात.
4. शरीराला हायड्रेट न ठेवणे
शरीराला हायड्रेटेड ठेवल्याने विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. ज्या लोकांना किडनीचा आजार आहे त्यांनी कमी प्रमाणात पाणी प्यावे. पण ज्यांची किडनी निरोगी आहे त्यांनी 3 ते 4 लिटर पाणी प्यावे.
5. साखरेचा जास्त वापर
जास्त प्रमाणात साखरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने लठ्ठपणा वाढतो. याशिवाय उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची समस्या वाढू शकते. बिस्किटे, तृणधान्ये, पांढरी ब्रेड सारख्या स्टार्च उत्पादनांचा आहारात वापर करू नये. कोणतेही उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्याचे लेबल नीट वाचा.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(These 5 habits are harmful to the kidneys)