‘हे’ घरगुती उपाय आहेत थंडीच्या दिवसांमध्ये होणाऱ्या विविध आजारांवर रामबाण इलाज
सध्या थंडी, ऊन आणि पाऊस असे समिश्र वातावरण आहे. बदलत्या हवामानामुळे अनेक जण आजारी पडत आहेत. अशा वातावरणामध्ये तुम्हाला तुमच्या शरीराची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.
Cold Wave Disease : सध्या थंडीची (winter) लाट आली आहे, वाढत्या थंडीमुळे अनेक जण घराच्या बाहेर जाणे टाळत आहेत. मात्र अनेकांना विविध कारणांमुळे घराच्या बाहेर पडावेच लागते. एकीकडे कडाक्याची थंडी (winter weather) पडली आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. पावसामुळे थंडीत आणखी भर पडली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये पाऊस पडत असल्यामुळे वातावरणात विचित्र बदल अनुभवायला मिळत आहे. सध्या थंडी, ऊन आणि पाऊस असे समिश्र वातावरण आहे. बदलत्या हवामानामुळे अनेक जण आजारी पडत आहेत. अशा वातावरणामध्ये तुम्हाला तुमच्या शरीराची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. (Winter health tips) थंडीमध्ये निर्माण होणाऱ्या विविध समस्यांवरील घरगुती उपयांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
हाडे दुखने, मांस पेशी जखडने : सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीमध्ये काही वेळेला अनेक दिवस ऊन पडत नाही. अनेक दिवस ऊन न पडल्याने शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे दुखने मांस पेशी जखडने अशा विविध समस्या उद्धभवतात. त्यामुळे अशा आजारांपासून वाचण्यासाठी शक्यतो थंड हवेत घराच्या बाहेर निघू नका. तसेच ज्या पदार्थांमधून डी जीवनसत्व मोठ्याप्रमाणात मिळेल अशा पदार्थांचे सेवन करा. यामुळे तुम्हाला आराम भेटेल.
सर्दी, खोकला होणे : हवामानामध्ये बदल झाल्यास अनेकांना सर्दी तसेच खोकल्याची समस्या जाणवते. अशावेळी शक्यतो घराच्या बाहेर पडू नका. तसेच सर्दी झाल्यास घरीच तुम्ही पाण्याची वाफ देखील घेऊ शकता. सर्दीसाठी विविध औषधी गुणर्धम असलेल्या वनस्पतींचा काढा देखील रामबाण उपाय ठरतो.
श्वास घेण्याची समस्या: थंडीमध्ये जवळपास सर्वांनाच सर्दी सारख्या आजारांचा सामना करावा लागतो. सर्दीमुळे कफ निर्माण होतो. कफ निर्माण झाल्यास श्वास घेण्यासाठी अडचण येते. श्वासनाची समस्या जाणवत असल्यास पिण्यासाठी गरम पाणी वापरावे, तसेच विविध पदार्थांचे गरम सूप प्यावे.
ब्लड प्रेशर संबंधित समस्या : थंडीमुळे रक्तदाब देखील कमी जास्त होऊ शकतो. ज्यांना आधीच रक्तदाबाची समस्या आहे. त्यांनी अशा वातावरणात विशेष काळजी घेणे गरजेचे असते. रक्तदाबाच्या समस्येमुळे डोके दुखणे, हायपरटेंशन अशा विविध आजारांचा धोका असतो. अशा व्यक्तींनी थंडीच्या दिवसांमध्ये नियमितपणे लसनाचे तसेच मधाचे सेवन करावे. यामुळे धोका कमी होतो.
Disclaimer : हा लेख सामान्य माहितीसाठी लिहिन्यात आला आहे. तुम्हाला जर वरीलपैकी कोणतीही समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधी घ्यावीत
संबंधित बातम्या
तुम्हाला आई व्हायचंय?… वंध्यत्व समस्यांवर करा सहज अत्याधुनिक उपचाराने मात!
तुम्हालाही सामान्य व्यक्तीपेक्षा थंडीचा अधिक त्रास होतो?; तर असू शकतो ‘हा’ आजार
डोळे फडफडणं शुभ की अशुभ, काय म्हणतं विज्ञान ? जाणून घ्या नेमकं कारण