Air Pollution : वायू प्रदूषणाच्या गंभीर परिणामांपासून रक्षण करण्याचे 5 नैसर्गिक उपाय!

बरेच लोक प्रदूषणाशी संबंधित आजारांमुळे आजारी पडत आहेत. खोकला, सर्दी आणि शिंकणे ही लक्षणे प्रमुख आहेत. प्रदूषणामुळे निरोगी लोकांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वाढते प्रदूषण टाळण्यासाठी तुम्ही 5 घरगुती उपाय करून पाहू शकता.

Air Pollution : वायू प्रदूषणाच्या गंभीर परिणामांपासून रक्षण करण्याचे 5 नैसर्गिक उपाय!
आरोग्य
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 12:34 PM

मुंबई : बरेच लोक प्रदूषणाशी संबंधित आजारांमुळे आजारी पडत आहेत. खोकला, सर्दी आणि शिंकणे ही लक्षणे प्रमुख आहेत. प्रदूषणामुळे निरोगी लोकांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वाढत्या प्रदूषणापासून सुरक्षित राहण्यासाठी आपण  5 घरगुती उपाय करून पाहू शकता. हे फुफ्फुस स्वच्छ करतील, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल आणि तुमचे शरीर डिटॉक्स करेल.

हळद

हळदीमध्ये शक्तिशाली अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. जे संक्रमणाशी लढतात. हळद हे एक सुपरफूड मानले जाते. जे फ्लू, ताप, दमावर उपचार करू शकते. हळद ब्राँकायटिस आणि फुफ्फुसाच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी उत्तम. झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट हळदीचे दूध प्या. यामुळे घसादुखीपासून आराम मिळेल.

मोहरीचे तेल

मोहरीचे तेल मुख्यतः स्वयंपाकघरात वापरण्यासाठी ओळखले जाते. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या, हृदयाच्या आरोग्याला चालना देणारे आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देणाऱ्या पोषक तत्वांव्यतिरिक्त, त्यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म देखील असतात. मोहरीचे तेल आणि लसूण यांचे मिश्रण पायांवर आणि कपाळावर थोड्या प्रमाणात चोळल्यास डोकेदुखी आणि सर्दीपासून आराम मिळतो.

बीटा कॅरोटीन

प्रदूषित हवेच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने डोकेदुखी होऊ शकते. जर तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही यासाठी आहारात बीटा कॅरोटीन युक्त पदार्थांचा समावेश करा. यामध्ये रताळे, गाजर, पालेभाज्या, बटरनट स्क्वॅश, कॅंटलूप, लेट्यूस, पेपरिका, जर्दाळू, ब्रोकोली आणि मटार यांचा समावेश आहे. हे पदार्थ तुमची प्रतिकारशक्ती वाढवतील आणि सर्व संक्रमण दूर ठेवतील.

तूप

आपल्या दररोजच्या आहारामध्ये तूपाचा समावेश करा. तुपामुळे प्रदूषकांचे दुष्परिणाम कमी होतात. तुम्ही तुमच्या नाकातोंडांना आणि पायाला थोडे कोमट तुपाने मसाज देखील करू शकता.

तुळशीचा चहा

जर तुम्ही प्रदूषणाशी संबंधित आजारांनी त्रस्त असाल किंवा तुमची फुफ्फुसे स्वच्छ ठेवायची असतील तर तुम्ही तुळशीचा चहा देखील घेऊ शकता. यासाठी एका भांड्यात 5-6 तुळशीची पाने पाण्यासोबत ठेवा. एक उकळी आणा. नंतर 15 मिनिटे गॅस मंद करा आणि उकळू द्या. एका कपमध्ये गाळून प्या. तुम्ही त्यात मध आणि गूळही घालू शकता.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(These are special measures to protect against the harmful effects of air pollution)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.