वाचा, मिठी मारण्याचे फायदे!
आपण कुणाला मिठी मारणे मारायला किंवा कुणी येऊन आपल्याला मिठी मारणे याचा काही फायदा पण असू शकतो असं जर कुणी तुम्हाला सांगितलं तर? बरेचदा आपल्याला कुणी येऊन मायेने जवळ घेतलं, मिठी मारली की बरं वाटतं, हे "बरं वाटणं" म्हणजे नेमकं काय? का बरं वाटत असेल?
मुंबई: तुम्ही म्हणाल मिठी मारण्याचे काय फायदे असू शकतात बुआ? आपला मूड ऑफ असला, तब्येत चांगली नसेल किंवा आपल्यावर एखादा दुःखाचा प्रसंग ओढवलेला असेल तर समोरचा आपल्याला मिठी मारतो. आपण कुणाला मिठी मारणे मारायला किंवा कुणी येऊन आपल्याला मिठी मारणे याचा काही फायदा पण असू शकतो असं जर कुणी तुम्हाला सांगितलं तर? बरेचदा आपल्याला कुणी येऊन मायेने जवळ घेतलं, मिठी मारली की बरं वाटतं, हे “बरं वाटणं” म्हणजे नेमकं काय? का बरं वाटत असेल? काय होतं कुणी आपल्याला मिठी मारली तर? का मारावी मिठी, फायदे काय? याचे आरोग्याला होणारे अनेक फायदे आहेत वाचा…
मिठी मारण्याचे फायदे
अनेक संशोधन आणि अभ्यासात असे आढळले आहे की जवळच्या व्यक्तीला मिठी मारणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, यामुळे अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. यावर एक नजर टाकूया.
जर तुमचा मूड खराब असेल आणि एखाद्या जवळच्या व्यक्तीने तुम्हाला मिठी मारली तर मूड अनेक पटींनी चांगला होतो आणि तुम्हाला पॉझिटिव्ह वाटू लागते. त्यामुळे दररोज आपल्या प्रिय जनांना, जवळच्या लोकांना मिठी मारली पाहिजे.
जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्याला मिठी मारता तेव्हा त्याला रिलॅक्स वाटतं आणि समोरची व्यक्ती तिचे दु:ख विसरते. हे मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे, त्यामुळे दु:खी व्यक्तीला मिठी मारली जाते.
मिठी मारल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते, ज्यामुळे शरीरात ऊर्जा येते आणि आपला थकवा दूर होऊ शकतो. त्याचबरोबर शरीराची कार्यक्षमताही सुधारते.
मिठी मारल्याने माणसाचं टेन्शन गायब होतं. त्यांना एक चांगली आठवण मिळते. मिठी मारल्याने त्यांना आनंदी आणि रिलॅक्स वाटते त्यामुळे मनावर सकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे मेंदू पूर्वीपेक्षा वेगवान होतो.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)