‘या’ पदार्थांमध्ये दुधापेक्षा जास्त असते कॅल्शियम
अशावेळी जर तुम्हाला दूध प्यायला आवडत नसेल तर तुम्ही कॅल्शियमसाठी आणखी अनेक गोष्टींचे सेवन करू शकता. होय, आम्ही तुम्हाला येथे अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम मिळते.
मुंबई: कॅल्शियम आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. कारण कॅल्शियममुळे शरीराची हाडे मजबूत होतात. पण लोकांचा असा विश्वास आहे की कॅल्शियम फक्त दुधातच आढळते. अशावेळी जर तुम्हाला दूध प्यायला आवडत नसेल तर तुम्ही कॅल्शियमसाठी आणखी अनेक गोष्टींचे सेवन करू शकता. होय, आम्ही तुम्हाला येथे अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम मिळते.
‘या’ पदार्थांमध्ये दुधापेक्षा जास्त असते कॅल्शियम
पनीर
चीज हे दुधात असलेल्या प्रथिनांपासून बनवले जाते आणि त्यात दुधापेक्षा कित्येक पटीने जास्त कॅल्शियम असते. त्यामुळे जर तुम्ही दूध पित नसाल तर तुम्ही पनीरचे सेवन करू शकता. पण हे लक्षात ठेवा की मर्यादित प्रमाणात याचे सेवन करा, अन्यथा तुम्हीही लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता.
दही
दही हे बहुतेक सर्वांचे आवडते. ज्यांना दूध आवडत नाही ते दह्याचे सेवन करू शकतात. आपण दररोज दुपारच्या जेवणासाठी दही खाऊ शकता. साखरेशिवाय दही खाल्ल्यास अधिक फायदा होईल.
मासे
मांसाहार करणाऱ्यासाठी मासे ही सर्वोत्तम आहेत. होय माशांमध्ये प्रथिने आणि कॅल्शियम दोन्ही असतात. त्यामुळे जर तुम्हाला दूध प्यायला आवडत नसेल तर तुम्ही मासे खाऊ शकता. याचे सेवन केल्याने तुम्ही कॅल्शियमची कमतरता दूर करू शकता.
बीन्स
बीन्समध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. याशिवाय असे अनेक मिनरल्स आहेत जे तुमचं आरोग्य योग्य ठेवण्याचं काम करतात आणि यासोबतच तुमची हाडेही मजबूत राहतात.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)