तुम्ही कधी टरबूज खाण्याचे तोटे वाचलेत का? वाचा
त्यामध्ये असलेले Vitamin A, Vitamin B6 सारखे घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. तर टरबूजमध्ये असलेले पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवते. त्याचबरोबर यामध्ये असलेले फायबर वजन कमी करण्यास मदत करते.पण तुम्हाला माहित आहे का टरबूज खाण्याचे काही तोटे आहेत. टरबूज खाण्याचे काय तोटे आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो.
मुंबई: टरबूज खाण्याचे शौकीन लोक उन्हाळ्याची वाट पाहत असतात. कारण उन्हाळा येताच बाजारात टरबूज येण्यास सुरुवात होते. होय, टरबूज फक्त खायलाच चविष्ट नाही, तर त्यामध्ये असलेले Vitamin A, Vitamin B6 सारखे घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. तर टरबूजमध्ये असलेले पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवते. त्याचबरोबर यामध्ये असलेले फायबर वजन कमी करण्यास मदत करते.पण तुम्हाला माहित आहे का टरबूज खाण्याचे काही तोटे आहेत. टरबूज खाण्याचे काय तोटे आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो.
टरबूज खाण्याचे तोटे
अतिसार
टरबूजमध्ये पाणी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने अतिसार, सूज येणे, पोट फुगणे यासारख्या समस्या उद्भवतात. कारण टरबूजमध्ये सॉर्बिटॉल नावाचे साखरेचे संयुग असते ज्यामुळे गॅस होतो.
उच्च साखरेची पातळी
मधुमेहाच्या रुग्णांनी टरबूजचे जास्त सेवन करू नये. कारण जास्त टरबूज खाल्ल्याने ग्लुकोजची पातळी वाढू लागते. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांनी टरबूजाचे सेवन करू नये.
यकृताला सूज येणे
जे लोक जास्त मद्यपान करतात त्यांनी टरबूजाचे सेवन काळजीपूर्वक करावे. कारण टरबूजमध्ये असलेल्या घटकांमुळे यकृतामध्ये जळजळ होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला यकृताशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर टरबूज खाणे टाळा.
अति-हायड्रेशन
ओव्हर-हायड्रेशन म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात पाण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होऊ लागते. टरबूज जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढू शकते. अशा स्थितीत शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते त्यामुळे थकवा आणि किडनीच्या समस्या उद्भवू शकतात.
(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)