‘ही’ लक्षणं म्हणजे तुमचं हृदय कमकुवत!
भारतासह जगभरात हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि ट्रिपल व्हेसल डिसीजमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. आपल्या देशात तेलकट आणि गोड पदार्थ खाण्याचा ट्रेंड खूप जास्त आहे. ज्यामुळे कोलेस्टेरॉल वाढते आणि मग हृदय कमकुवत होऊ लागते.
मुंबई: हृदय हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, जोपर्यंत ते योग्य प्रकारे कार्य करत आहे तोपर्यंत आपले जीवन सामान्यपणे चालत राहील. भारतासह जगभरात हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि ट्रिपल व्हेसल डिसीजमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. आपल्या देशात तेलकट आणि गोड पदार्थ खाण्याचा ट्रेंड खूप जास्त आहे. ज्यामुळे कोलेस्टेरॉल वाढते आणि मग हृदय कमकुवत होऊ लागते. त्यामुळे हृदयाची समस्या वेळीच ओळखून घ्या, अन्यथा तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो. जाणून घेऊया जेव्हा हृदय कमकुवत होऊ लागते तेव्हा आपल्याला काय लक्षणं दिसून येतात.
हृदयाच्या कमकुवतपणाची लक्षणे
1. हृदयाचे आरोग्य
आपल्या हृदयाच्या ठोक्यावरून ओळखले जाते की आपलं हृदय कसं आहे? त्याचं आरोग्य कसं आहे? याचमुळे डॉक्टर बरेचदा आपल्या स्टेथोस्कोपद्वारे हृदयाची स्थिती तपासतात. सहसा आपले हृदयाचे ठोके एका मिनिटात 70 ते 80 असतात. जर तुमच्या हृदयाचे ठोके सामान्य परिस्थितीतही 100 च्या पुढे जात असतील तर ही गंभीर आजाराची लक्षणे असू शकतात. अशावेळी समजून घ्या की आपले हृदय कमकुवत झाले आहे.
2. लवकर थकवा :
अनेकदा अनेक तरुणांना काम केल्यानंतर लवकर थकवा येतो, त्यामुळे तुमचे हृदय कमकुवत झाले असण्याची दाट शक्यता असते. खरं तर जेव्हा नसांमध्ये अडथळा येतो तेव्हा रक्त शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत नीट पोहोचत नाही, ज्यामुळे अशक्तपणा लवकर येऊ लागतो.
3. छातीत दुखणे
छातीत दुखणे ही एक गंभीर समस्या आहे. हे खूप गांभीर्याने घ्यावे आणि ताबडतोब चांगल्या डॉक्टरांना भेटले पाहिजे. खरं तर रक्तवाहिन्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आला तर हृदयापर्यंत रक्त पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, ज्यामुळे छातीत दुखतं.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)