वजन कमी करणारे टॉप 3 पदार्थ!
जेव्हा आपले शरीर गरजेपेक्षा जास्त कॅलरी घेते तेव्हा शरीरात चरबी जमा होते. यामुळे तुम्ही लठ्ठपणाला बळी पडता, अशा वेळी आहारात कमी कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश करावा. वजन कमी करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे? वाचा
मुंबई: लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या आहे. ज्यामुळे बहुतांश लोक त्रस्त आहेत. वाढलेले वजन तुमचा लुक खराब करण्याचे काम करते. त्याचबरोबर लठ्ठपणामुळे तुम्हाला अनेक आजारही होऊ शकतात. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी वर्क आऊटसोबतच हेल्दी डाएट घेणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपले शरीर गरजेपेक्षा जास्त कॅलरी घेते तेव्हा शरीरात चरबी जमा होते. यामुळे तुम्ही लठ्ठपणाला बळी पडता, अशा वेळी आहारात कमी कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश करावा. वजन कमी करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे? वाचा
वजन कमी करण्यासाठी
- दही- दही हा कमी कॅलरीयुक्त अन्नाचा चांगला पर्याय आहे. हा प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहे, ज्यामुळे हे पोट बराच काळ भरलेले ठेवते. तसेच साखरेची लालसा नियंत्रित करण्यासही उपयुक्त ठरते. ज्यामुळे तुम्ही अनहेल्दी खाणे टाळता. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर साध्या दह्यामध्ये पोषक तत्वांचे प्रमाण कमी आणि कॅलरी जास्त असते. अशावेळी वजन कमी करायचं असेल तर साधं दही खावं.
- अंडी- वजन कमी करण्यासाठी अंड्याचे सेवन खूप फायदेशीर आहे. यात प्रथिने भरपूर प्रमाणात असतात आणि कॅलरीज खूप कमी असतात. ब्रेकफास्टमध्ये अंडी खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते आणि पुन्हा पुन्हा भूक लागत नाही. यामुळे आपण गरजेपेक्षा जास्त खात नाही आणि वजन कमी करण्यास मदत होते. त्यामुळे अंड्यांचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
- सफरचंद – दररोज एक सफरचंद खाल्ल्याने तुम्ही आजारांपासून तर दूर राहालच, शिवाय वजनही नियंत्रित राहील. त्यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.आम्ही याला दुजोरा देत नाही.)