पायऱ्या चढताना लागतोय दम ? दुर्लक्ष करणे पडेल महागात, आजपासूनच घ्या तब्येतीची काळजी
पायऱ्या किंवा जिना चढल्यावर दम लागणे हे तर सर्वांबाबतच होते, ती सामान्य गोष्ट आहे. पण एखाद्या व्यक्तीला हा त्रास वारंवार आणि जास्त प्रमाणात होत असेल तर ही चिंतेची बाब आहे. अशा वेळी काही उपाय करणे महत्वाचे ठरते.
नवी दिल्ली : आजकाल सर्वांचं आयुष्य एवढं धावपळीचं झालं आहे ना की कोणालाही स्वस्थ बसायला वेळ नाही. व्यस्त जीवनशैलीत (busy lifestyle) प्रत्येकालाच आरोग्याची विशेष काळजी घेता येतेच असही नाही. त्यामुळे आपल्या शरीरावर आणि पर्यायाने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. बैठी जीवनशैली, अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयी आणि शारीरिक निष्क्रियता यांमुळे वजन वाढते (weight gain), लठ्ठपणा येतो आणि लोकांचे हाल होतात. बरेचसे लोक आतून कमकुवत होतात. त्यामुळे आजकाल बहुतेक लोक जिना चढण्याऐवजी लिफ्टचा वापर करतात. तुमच्या लक्षात आले असेल की ऑफिसमध्येही बरेचसे लोक पायऱ्या चढून जाण्याऐवजी लिफ्ट वापरणं पसंत करतात. काही वेळा जिना चढला तर लगेच लोकांना दम लागतो (breathlessness while climbing stairs) , श्वासही फुलतो आणि हृदयाचे ठोकेही वाढतात.
दम लागणे हलक्यात घेऊ नका, आहारात करा सुधार
बऱ्याच वेळेस असं घडतं की काही पायऱ्या चढल्याबरोबर आपण धापा टाकू लागतो. हे काही सामान्य लक्षण नाही आणि चांगलं तर मुळीच नाही. दम लागण्यामागे अनेक कारणे दडलेली असू शकतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरात पोषक तत्वांची आणि उर्जेची कमतरता असणे. मात्र, बऱ्याच वेलेस असं होतं की पुरेशी पोषक तत्त्वं मिळाल्यानंतरही शरीराच्या थोड्याशा हालचालीनंतरही लोकांना लगेच थकायला होतं. हे एखाद्या अंतर्गत आजाराचे लक्षणही असू शकते. निद्रानाश, मानसिक आजार आणि अशक्तपणा हेही त्यामागचे कारण असू शकते, ज्यामुळे लोकांना लवकर थकवा येतो.
श्वास फुलल्यास अथवा दम लागल्यास या गोष्टींची घ्या काळजी
पायऱ्या चढताना तुम्हालाही थकवा येत असेल तर ते कोणत्याही गंभीर आजाराचे लक्षण नाही. पण ते हलक्यात घ्यावे अथवा त्याकडे दुर्लक्ष करावे, असेही नाही. जर तुम्हालाही पायऱ्या चढताना या दम लागत असेल अथवा वर नमूद केलेल्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर तुम्ही काही खास गोष्टींची काळजी घ्यावी.
– शरीराचे वजन जास्त वाढले असेल तरीही लोक धापा टाकू लागतात.
– जर तुम्ही रात्री उशिरा झोपत असाल आणि सकाळी उशिरा उठत असाल तर ही समस्या तुमच्या आरोग्यासोबतही होऊ शकते. त्यामुळे झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा.
– दररोज पुरेशी झोप घ्या. प्रौढ व्यक्तींनी कमीत कमी 8 तास तरी झोपले पाहिजे.
– निरोगी आहार घ्या, त्यामध्ये सर्व पोषक तत्वांचा समावेश करावा
– नियमित व्यायाम आणि योगासने करावीत.