तुमच्या स्वयंपाकघरातील ‘हे’ पदार्थ कधीच एक्सपायर होत नाहीत…

आपण बाजारातून आणत असलेल्या जवळपास सर्वच पदार्थांवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. त्या तारखेच्या आत त्या पदार्थांचा वापर करणे आवश्‍यक असते. नाहीतर ते पदार्थ खराब होण्याचा धोका असतो. पण आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांची एक्सपायरी डेट नसते.

तुमच्या स्वयंपाकघरातील ‘हे’ पदार्थ कधीच एक्सपायर होत नाहीत...
स्वयंपाक घरामधील या गोष्टी कधीही खराब होत नाहीत. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 10:41 AM

बाजारातून कुठल्याही पदार्थांची खरेदी करताना आपण आधी त्यावर दिलेली एक्सपायरी डेट (expiry date) बघत असतो. एक्सपायरी डेट जवळची असेन तर आपण असे पदार्थ खरेदी करणे टाळतो. एखादी वस्तू खरेदी करीत असताना त्यावरील तारीख अवश्‍य बघण्याचा सल्ला आपणास अनेकदा दिला जात असतो. एखादी वस्तू खायची असो वा वापरायची, एक्सपायरी डेट निघून गेल्यानंतर त्या वस्तूचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे त्यांना फेकून द्यावे लागते. पण आपल्या स्वयंपाकघरात (kitchen) अशा काही वस्तू असतात ज्यांची कधीच एक्सपायरी डेट नसते. काही गोष्टी जितक्या जुन्या (Old) होतात तितक्या चांगल्या मानल्या जातात. त्यामुळे त्यांना फेकून देण्याची चूक कधीही करू नका… अशा पदार्थांची माहिती जाणून घेउया

तांदूळ

पांढरा तांदूळ जितके जुने तितके चांगले आणि चविष्ट लागतात. त्यामुळे तांदूळ खरेदी करताना तो जास्तीत जास्त जुना खरेदी केला जात असतो. त्यामुळे तांदळाची एक्सपायरी डेट नसते. परंतु जर तुम्ही ब्राऊन राईस वापरत असाल तर ते सहा महिन्यांत वापरावे लागेल कारण ते जास्त तेलामुळे लवकर खराब होते.

मोहरी

मोहरी खराब होत नसल्याने लोक तिला जास्त काळ ठेवतात. त्यातून निघणारे तेलही खराब होत नाही. त्यामुळे या गोष्टी जुन्या झाल्या तर फेकून देण्याची चूक करू नका. मोहरी जुनी झाली असली तरी त्यातील पोषक घटक संपत नाही.

लोणचे

लोणचे पाण्यापासून दूर ठेवले तर ते वर्षानुवर्षे खराब होत नाही. लिंबाचे लोणचे जितके जुने तितके चांगले लागते. लोणचे जुने झाल्यास ते कोरडे होत असले तरी ते खराब होत नाही. लिंबाचे जुने लोणचे पोटासाठी उत्तम औषधी मानले जात असते. त्यामुळे लोणचे जुने झाल्यावर ते खराब होते म्हणून फेकून देऊ नका.

मध

मध शुध्द असेल तर वर्षानुवर्षे ठेवले तरी ते खराब होत नाही. मध जास्त वेळ ठेवल्यानंतर गोठायला लागले किंवा खराब झाले तर समजा की ते खरे मध नाही. त्यामुळे शुध्द मध कधीही जास्त काळ ठेवल्याने खराब होत नाही.

मीठ आणि साखर

मीठ देखील जास्त काळ खराब होत नाही किंवा त्याला किडही लागत नाही. पाण्याच्या संपर्कामुळे त्यात ओलावा येऊ शकतो, परंतु तरीही ते खराब होत नाही. साखरदेखील आपण बराच काळासाठी साठवू शकता. ते लवकर खराब होत नाही.

संबंधित बातम्या : 

काय सांगता…टाईप-2 मधुमेह 90 दिवसांमध्ये बरा होता…जाणून घ्या यासाठी डाॅक्टरांनी नेमक्या कोणत्या टिप्स फाॅलो करायला सांगितल्या आहेत!

Health care : पचनक्रिया मजबूत करण्यासाठी हे पदार्थ खा, सर्व समस्या दूर राहतील!

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.