निरोगी राहायचं असेल ‘या’ गोष्टींचा आहारात समावेश करा, तज्ज्ञांकडून यादीच जाणून घ्या

Healthy Diet: अनेकदा आपण ज्याला आरोग्यदायी आणि खाण्यायोग्य आहार समजतो ते रोज खाल्ले तर शरीर आजारांचे घर बनते. अशावेळी तज्ज्ञांनी अशा गोष्टींविषयी सांगितले आहे की, ज्या गोष्टींचा आहारात समावेश करून तुम्ही निरोगी राहू शकता.

निरोगी राहायचं असेल ‘या’ गोष्टींचा आहारात समावेश करा, तज्ज्ञांकडून यादीच जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jan 01, 2025 | 3:56 PM

Healthy Diet: आपल्या आरोग्याचा थेट संबंध अन्नाशी आहे. हल्ली आपले खाणे-पिणे असे झाले आहे की, ते आजारांचे कारण बनतात. अनेकदा आपण विचार न करता काही गोष्टी खातो, ज्यामुळे आपल्या आरोग्याला हानी पोहोचते. हिवाळ्यात आपण आपल्या आहाराची काळजी घेतली पाहिजे, असे आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दिल्लीतील श्री बालाजी अ‍ॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटचे डॉ. अरविंद अग्रवाल सांगतात की, आजकालची अनियमित जीवनशैली आणि खराब आहार हळूहळू आपल्या शरीराला आजारांचे घर बनवत आहे. आपल्या आहारात जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता असते. आपल्या आहारत काय खावं किंवा काय खाणे टाळावे, हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

काय म्हणतात तज्ज्ञ?

व्हाईट ब्रेड, बर्गर आणि पिझ्झा सारख्या पिठापासून बनवलेल्या गोष्टी आपल्या शरीराला हानी पोहोचवत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या गोष्टींऐवजी मल्टीग्रेन ब्रेड आणि घरगुती पोळी किंवा पराठे अशा संपूर्ण धान्यापासून बनवलेल्या वस्तू खा. त्याचप्रमाणे साखरेचे जास्त सेवन केल्याने मधुमेह आणि लठ्ठपणा होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

पांढऱ्या साखरेच्या जागी गूळ किंवा मध घाला. सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅक्ड ज्यूसऐवजी नारळ पाणी, लिंबूपाणी किंवा ताज्या फळांचा रस प्या. तसेच समोसे आणि चिप्सऐवजी भाजलेले चणे किंवा ड्रायफ्रूट्स आपली सवय बनवा.

‘या’ गोष्टीही लक्षात ठेवा

नूडल्स आणि केक सारखे प्रक्रिया केलेले आणि पॅकेज्ड पदार्थ खाणे टाळा. त्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह आणि जादा मीठ असते, जे शरीराला हानी पोहोचवू शकते. स्वयंपाकात रिफाइंड तेलाऐवजी मोहरी, ऑलिव्ह किंवा नारळाचे तेल वापरा. पांढऱ्याऐवजी तपकिरी तांदूळ खा.

आहारात सेंधा मीठ वापरा

आहारात सेंधा मीठ वापरा. बाजारातील मिठाई वगळा आणि रवा शिरा किंवा गुळाची मिठाई यासारखे हलके आणि निरोगी घरगुती पदार्थ खा. रोजच्या आहारात हिरव्या भाज्या, ताजी फळे आणि डाळींचा समावेश करा. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही निरोगी राहाल.

निरोगी आयुष्य जगण्यासाठी आपल्याला चांगला आहार घेणं गरजेचं आहे. अनियमित जीवनशैली आणि खराब आहार हळूहळू आपल्या शरीराला आजारांचे घर बनवत आहे. त्यामुळे आम्ही वर सांगितलेल्या गोष्टी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेतल्यास तुम्हाला आरोग्यदायी आहार मिळेल. नूडल्स आणि केक सारखे प्रक्रिया केलेले आणि पॅकेज्ड पदार्थ खाणे टाळा. त्याऐवजी तुम्ही रोजच्या आहारात हिरव्या भाज्या, ताजी फळे आणि डाळींचा समावेश करा.

( डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.