‘या’ औषधी वनस्पती आहेत मानसिक आरोग्यासाठी वरदान; जाणून घ्या औषधी गुणधर्म

तुम्हाला जर जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्या मानसिक (Mental Health) आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. सध्याचे जीवन हे अधिक गतिमान झाले आहे.  त्याचबरोबर व्यक्तीवर येणाऱ्या ताण तणावामध्ये देखील वाढ झाली आहे. तणाव वाढल्यास व्यक्ती अनेकवेळा डिप्रेशनमध्ये (depression) देखील जाते.

'या' औषधी वनस्पती आहेत मानसिक आरोग्यासाठी वरदान; जाणून घ्या औषधी गुणधर्म
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 5:46 PM

Health tips :  तुम्हाला जर जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्या मानसिक (Mental Health) आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. सध्याचे जीवन हे अधिक गतिमान झाले आहे.  त्याचबरोबर व्यक्तीवर येणाऱ्या ताण तणावामध्ये देखील वाढ झाली आहे. तणाव वाढल्यास व्यक्ती अनेकवेळा डिप्रेशनमध्ये (depression) देखील जाते. त्यामुळे आपल्या मानसिक आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. तणावरहीत जीवन जगण्यासाठी सकस आहारासोबतच (Diet) नियमित व्यायाम करणे फायद्याचे ठरते. अनेक लोक आपल्या मेंदूला सतत ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी चहा, कॉफी सारख्या उत्तेजक पेयांचा वापर करतात. या पेयांमुळे काहीकाळ जरी तुम्ही ऍक्टिव्ह राहात असाल, मात्र अशा पेयांचे दीर्घकाळ अधिक सेवन केल्यामुळे त्याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. चहा, कॉफी व्यतिरिक्त देखील असे अनेक पदार्थ आहेत, ते तुम्हाला तणावरहित आयुष्य जगण्यास मदत करू शकता. आज आपण अशाच काही पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत.

अश्वगंधा

अश्वगंधा ही सर्वोत्तम औषधी वनस्पतींपैकी एक आहे. अश्वगंधा शारीरिक आणि भावनिक तणाव हाताळण्यास मदत करते. इंडियन जर्नल ऑफ सायकोलॉजिकल मेडिसिनमध्ये प्रकाशीत झालेल्या लेखानुसार  ही औषधी वनस्पती कॉर्टिसोल या तणाव संप्रेरकाची पातळी कमी करण्यासाठी मदत करते.  या औषधी वनस्पतीच्या नियमित सेवनाने, व्यक्तीला कमी ताण आणि मानसिक शांतता जाणवते. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप दूध उकळून त्यात अर्धा चमचा अश्वगंधा पावडर टाकून पिल्यास, व्यक्तीचे मानसिक स्वस्थ चांगले राहण्यास मदत होते.

लव्हेंडर

लव्हेंडर ही एक सुगंधी वनस्पती आहे. तिच्यामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत. ही सुगंधी औषधी वनस्पती सामान्यतः अरोमाथेरपीसाठी वापरली जाते. आरोग्य अहवालानुसार सुंगधी तेलाने शरीराची मालिश केल्यामुळे ताण-तणाव दूर होतो. एक चांगले आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मदत होते. म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी लव्हेंडर तेलाना मालिश करावी.

जिरे

जिऱ्याचा वापर जवळपास प्रत्येक घरात केला जातो. भारतात हा मसाल्याचा पदार्थ जवळपास सर्व प्रकारच्या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. लोहयुक्त जिऱ्याचे अनेक फायदे आहेत. हे केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर तणाव कमी करण्यास देखील मदत करते. यासाठी एका भांड्यात एक कप पाणी उकळा. अर्धा चमचा जिरे घ्या आणि उकळत्या पाण्यात टाका. 2 मिनिटे शिजू द्या. सकाळी.झोपेतून उठल्यानंतर जर नित्यनियमाने या काढ्याचे सेवन केल्यात तणाव दूर होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या

Corona in India: कोरोना चाचण्या वाढवा, चिठ्ठी लिहून केंद्र सरकारच्या सर्व राज्यांना सूचना

Onion juice : दररोज कांद्याचा रस प्या आणि कोरोनापासून दूर राहा!

तुम्ही झोपल्यानंतर घोरता, मग हे घरगुती उपाय कराच!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.