तणावमुक्त राहण्यासाठी खास टीप्स…एका क्लिकवर जाणून घ्या कसे राहाल तणावमुक्त
गेल्या काही वर्षांमध्ये लोकांच्या आयुष्यात तणाव खूप वाढला आहे. कामाचा ताण आणि घरातील जबाबदारी वाढत्या स्पर्धेच्या युगात माणूस यशाकडे धावत चालला आहे. त्यामुळे त्याचा मानसिक आरोग्यावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. तणावमुक्त आयुष्य असावं असं अनेकांना वाटत असतं पण हे आजच्या युगात शक्य दिसत नाही. मग अशावेळी काय केलं तर आपण तणावमुक्त आयुष्य जगू शकतो.
हो आज तणाव अनेकांचा आयुष्याचा एक भाग झाला आहे. या तणावपूर्ण (Stress) वातावरणामुळे अनेक जण डिप्रेशनमध्ये जाताना आपण पाहतो. तणावमुक्त राहण्यासाठी अनेक जण योगसाधना (Yoga) करतात. अगदी जीम जाऊन तणाव (Health) कमी करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या घरातील किचनमध्ये असे काही पदार्थ आहेत ज्यामुळे तुम्ही तणाव कमी करु शकतात.
कुठले आहेत ते पदार्थ
1. अश्वगंधा – अश्वगंधा ही सर्वोत्तम औषधी वनस्पती आहे. अश्वगंधा तणाव संप्रेरक, कोर्टिसोलची पातळी कमी करण्यासाठी मोठी मदत करते. या औषधी वनस्पतीचं नियमित सेवना केल्यास याचा नक्की फायदा दिसून येतो. या औषधामुळे व्यक्तीला ताण कमी जाणवतो. हे औषधं कसं घेणार – एक कप गरम दुधात अश्वगंधा पावडर मिक्स करा आणि रात्री झोपण्याच्या अर्धा तासाआधी प्या. अश्वगंधा कुठल्याही मेडिकलमध्ये सहज उपलब्ध आहे. 2. लैव्हेंडर – लैव्हेंडरच्या ताजेतवाने सुगंधामुळे आपल्याला शांतता लाभते. या सुगंधी औषधी वनस्पतीचा अरोमाथेरपीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तर लैव्हेंडर तेलाच्या मालिशने तणाव कमी होण्यास खूप मदत होते. कसा करायचा याचा उपयोग – एका भांड्यात एक कप पाणी उकळून त्यात लैव्हेंडर तेलाचे 2 ते 4 थेंब टाका. आणि या पाण्याची वाफ घ्या.
3. जिरा – हो जिरामुळे तणाव कमी करण्यास मदत मिळतो. भारतीय आहारात जिराचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. या जिराचा जसा वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो तसाच त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी होतो. कसा होतो फायदा – एका भांड्यात पाणी गरम करा आणि त्यात एक चमचा जिरा मिक्स करा. हे पाणी अजून साधारण 2 मिनिटं उकळू द्या. या पाण्याचं सेवन सकाळी उठल्यावर करावं. 4. तुळस – हो तुळशीला आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे. ही पण एक प्रकारची औषधी वनस्पती आहे. आणि ही प्रत्येक घरात दिसून येते. तुळशीला आधात्मिकमध्येही विशेष महत्त्व आहे. तज्ज्ञांच्या मते तुळशीमध्ये ताणव कमी करण्यासाठी गुणधर्म आहेत. कसा करायचा तुळशीचा वापर – अर्धा कप पाण्यात 5 ते 7 पानं तुळशीचे टाका आणि हे पाणी साधारण 10 मिनिटं उकळा. त्यानंतर हे पाणी कोमट झाल्यावर त्यात लिंबाचा रस घालून याचं सेवन करा.