‘या’ चार सवयी असलेल्यांना ब्रेन स्ट्रोकचा धोका सर्वाधिक, लगेच सवयी बदला!
माणसाचं आयुष्य त्याच्या सवयींमुळेच घडतंही आणि बिघडतंही असं सांगितलं जातं. तुमच्या सवयी काय आहेत याचा केवळ तुमच्या सामाजिक जीवनावरच नाही तर तुमच्या आरोग्यावरही परिणाम करतात. (These Lifestyle Habits Can Increase the Risk of Brain Stroke)
नवी दिल्ली: माणसाचं आयुष्य त्याच्या सवयींमुळेच घडतंही आणि बिघडतंही असं सांगितलं जातं. तुमच्या सवयी काय आहेत याचा केवळ तुमच्या सामाजिक जीवनावरच नाही तर तुमच्या आरोग्यावरही परिणाम करतात. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यावरही या सवयींचा मोठा परिणाम होत असतो. काही सवयींमुळे तर तुम्हाला ब्रेन स्ट्रोकही येऊ शकतो.
ब्रेन स्ट्रोक ही एक खतरनाक स्थिती आहे. जेव्हा मानसाच्या मेंदू किंवा डोक्यातील विभिन्न भागात ऑक्सिजन आणि पोषक तत्त्व योग्य पद्धतीने पोहोचत नाही तेव्हा ब्रेन स्ट्रोक होत असतो. या विषयाचे तज्ज्ञ जॉन हॉपकिन्स यांच्या मते, गर्भनिरोधक गोळ्या हे सुद्धा ब्रेन स्ट्रोकचं एक कारण होऊ शकतं. यामुळे शरीरात अॅस्ट्रोजनचा स्तर वाढतो. त्यामुळे ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो. ब्रेन स्ट्रेकची अन्य कारणं काय आहेत? त्यावर टाकलेला हा प्रकाश.
मद्यसेवन
दारू प्यायल्याने आपलं आरोग्य उत्तम राहतं असा तुमचा समज असेल तर तो तात्काळ दूर करा. तज्ज्ञांच्या मते, रोज दोन पेगही घेतले तरी ब्लड प्रेशर आणि स्ट्रोकचा धोका निर्माण होतो. तर, एखादी व्यक्ती एकावेळी 8 पेग घेत असेल आणि महिला 6 पेग घेत असेल तर या दोघांनाही स्ट्रोकचा तेवढाच धोका असतो.
CDC च्या मते, महिलांनी दिवसाला एका पेग शिवाय अधिक पेग घेता कामा नये. तर पुरुषांनी दिवसाला दोनपेक्षा अधिक पेग घेता कामा नये.
स्मोकिंग करणे
स्मोकिंग म्हणजे कूल राहण्याची एक पद्धत आहे, असा आपण गैरसमज करून ठेवला आहे. त्याचाच परिणाम म्हणून प्रत्येक दुसरा किंवा तिसरा व्यक्ती या स्मोकिंगच्या आधीन गेला आहे. तर, धुम्रपान केल्याने इस्केमिक स्ट्रोकचा धोका अधिक असतो. त्यामुळे स्मोकिंगची सवय पूर्णपणे सोडा, असं जॉन हॉपकिन्स यांनी सांगितलं.
फिजिकल अॅक्टिव्हिटी नसणे
आपण अशा युगात वावरत आहोत जिथे आता बसल्या बसल्या सर्व कामे करणं शक्य आहे. सध्या तर वर्क फ्रॉम होम ही संकल्पनाही चांगली रुढ झाली आहे. त्यामुळे लोक घरी बसूनच काम करत आहेत. मात्र, त्याचा उलटा परिणाम होत आहे. तास न् तास बसून काम केल्याने वजन वाढणे आणि स्थुलता येण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे शरीरात अनेक आजारही निर्माण होत आहेत. त्यामुळे शरीरातील अंग व्यवस्थित काम करताना दिसत नाहीत. त्यामुळेही तुम्हाला ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी रोज थोडी एक्सरसाईज करा आणि आणि हेल्दी डाएट घ्या.
CDCच्या मते, पुरुषांनी दर आठवड्याला कमीत कमी 2.5 तास अॅरोबिक एक्सरसाईज केली पाहिजे. त्याचा अर्थ आठवड्यातून काही तास ब्रिस्क वॉक केली पाहिजे.
आजार असेल तर
तुम्हाला एखादा आजार असेल तरीही तुम्हाला स्ट्रोक येऊ शकतो. त्यात डायबिटीज, हायपरटेन्शन, हाय कोलेस्ट्रोल आणि एट्रियल फायब्रिलेशनच्या आजाराने ग्रस्त लोकांनाही स्ट्रोक येऊ शकतो. मात्र, त्याला नियंत्रित केलं जाऊ शकतं. मात्र, फॅमिली हिस्ट्री, वय, लिंग यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण येऊ शकत नाही.
उपचार
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, वेळ बरबाद करणं म्हणजेच मेंदूचीही हानी आहे. एखाद्या व्यक्तीला स्ट्रोक आला असेल तर त्याच्यावर तात्काळ उपचार केला जातो. त्याच्या डोक्यातील रक्त पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न डॉक्टर करत असतात. जर व्यक्तीला हेमरेजिक स्ट्रोक आला असेल तर त्याची सर्जरी केली जाते.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 8 October 2021 https://t.co/XynZW9JJpr #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 8, 2021
संबंधित बातम्या:
साधारण चेस्ट पेन आणि हार्ट अॅटॅकच्या वेदनेत फरक काय?, अलर्टनेसमुळे वाचू शकतो जीव
मोबाईलवर चॅट करता करता वजन कमी करा; ‘या’ एक्सरसाईज करून पाहाच
Health Tips : जीवनशैलीच्या या सवयी ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढवू शकतात, वाचा याबद्दल!
(These Lifestyle Habits Can Increase the Risk of Brain Stroke)