हे संकेत दर्शवतात की तुम्हाला कोणताही आजार होणार नाही, तुमचे शरीर पूर्णपणे आहे निरोगी!
जेव्हा शरीर निरोगी असते तेव्हाही संकेत देते आणि जेव्हा शरीर आजारी असते तेव्हाही संकेत देते. आजारी असल्यावर तर आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. पण आज आपण शरीर निरोगी असताना कोणत्या प्रकारचे संकेत देते हे बघणार आहोत.
मुंबई: चांगल्या आरोग्यासाठी सकस आहार, चांगली झोप आणि तणावमुक्त वातावरण हवे. जर एखाद्या व्यक्तीने या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले तर त्याचे शरीर निरोगी राहते. जेव्हा शरीर निरोगी असते तेव्हाही संकेत देते आणि जेव्हा शरीर आजारी असते तेव्हाही शरीर संकेत देते. आजारी असल्यावर तर आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. पण आज आपण शरीर निरोगी असताना कोणत्या प्रकारचे संकेत देते हे बघणार आहोत.
निरोगी शरीर देते ही लक्षणे
चांगली झोप
जर तुम्ही बेडवर झोपल्यानंतर 30 मिनिटांच्या आत झोपत असाल तर हे आपल्या शरीराची झोपेची पद्धत योग्य असल्याचे लक्षण आहे, जे निरोगी शरीरासाठी आवश्यक आहे. कारण चांगली झोप घेणं हे निरोगी शरीराचं लक्षण आहे.
नियमित मासिक पाळी येणे
दर महिन्याला योग्य वेळी मासिक पाळी येत असेल तर हे तुमची प्रजनन संस्था निरोगी असल्याचे लक्षण आहे. त्यामुळे जर तुम्हाला योग्य वेळी पीरियड्स येत असतील तर तुमचे शरीर निरोगी आहे हे समजून घ्या.
थकवा न जाणवणे
दैनंदिन कामे करताना थकवा जाणवत नसेल तर हे तुमचे शरीर निरोगी असल्याचे लक्षण आहे. अशा वेळी आजार आपल्यापासून दूर राहतात.
चांगली स्मरणशक्ती
जर तुमची शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म मेमरी चांगली असेल तर हे निरोगी मेंदूचे लक्षण आहे. होय, जर तुमची स्मरणशक्ती वेगवान असेल तर हे देखील निरोगी शरीराचे लक्षण आहे.
पायऱ्या सहज चढणे
पायऱ्या चढताना श्वास नीट घेता येत नसेल तर हे निरोगी हृदयाचे लक्षण आहे. होय, तुम्ही रोज पायऱ्या चढा आणि स्वतःकडे लक्ष द्या असे केल्याने तुम्हाला कळेल की तुमचे शरीर निरोगी आहे की नाही.
(डिस्क्लेमर: इथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)