Children’s day: डिजीटल डिटॉक्सच्या ‘या’ ट्रिक्ससह मुलांचे मानसिक आरोग्य ठेवा निरोगी
जर तुम्हाला तुमच्या मुलांचे मानसिक आरोग्य चांगले व निरोगी राखायचे असेल तर हे उपाय करून पहा.
नवी दिल्ली – दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी भारतात बालदिन (Children’s Day 2022) साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. मुलांचे हक्क, शिक्षण आणि कल्याणाची माहिती लोकांना व्हावी हे हा दिवस साजरा करण्यामागचे उद्दिष्ट आहे. तसं पहायला गेलं तर परदेशाप्रमाणे भारतातील तरुण वर्ग आणि मुलांचे मानसिक आरोग्य (mental health)बिघडण्याची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. 2019 सायकॅट्रीच्या एका जर्नलमध्ये पब्लिश झालेल्या एका रिपोर्टनुसार, भारतात सुमारे 5 कोटी मुलं ही मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांनी ग्रस्त आहे. हे आकडे कोरोना पूर्व काळातील आहेत. जर तुम्हाला तुमच्या मुलांचे मानसिक आरोग्य चांगले व निरोगी राखायचे असेल तर काही ट्रिक्स (tricks) करून पहा.
डिजीटल डिटॉक्स (Digital Detox)
सध्याचे युग डिजिटल असून त्याचा मुलांवर कसा परिणाम होत आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ज्यावर मुलं तासनतास वेळ घालवतात. सोशल मीडियाच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजूंबााबत मुलांना समजावून सांगा. हे एक डिजिटल डिटॉक्स आहे आणि आठवड्यातून कमीतकमी दोन वेळा हे करून पहा.
सेफ स्पेस
आजकालची मुलं मॉडर्न आहेत, त्यांना लहान वयातच त्यांची स्पेस हवीशी वाटते. एक पालक म्हणून आपल्याला त्यांची काळजी वाटणं स्वाभाविक आहे, पण मुलांना मात्र ते ओझं वाटू लागतं. अशा वेळी मुलांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करायला हवे.
मुलांच्या भावना समजून घ्या
जुन्या काळात बहुतांश पालक मुलांना रागवून त्यांच्यावर दबाव टाकत असत. मात्र आता काळ बदलला आहे. मुलांवर रागावून त्यांचे शत्रू बनण्यापेक्षा त्यांच्या भावना समजून घ्याव्यात. पालकांनी मुलांशी मित्रांप्रमाणे वागावे, त्यांना समजून घ्यावे. अशामुळे मुलं त्यांचा आनंद आणि त्यांच्या समस्या, त्रास या दोन्ही गोष्टी तुमच्याशी शेअर करू शकतील व त्यांना फ्री वाटेल.
मेडिटेशन (Meditation Benefits)
मेडिटेशन वा योगासनांच्या सहाय्याने केवळ मोठी माणसंच नव्हे तर लहान मुलेही त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राखू शकतात. पालकांनी मुलांना मेडिटेशन व योगासनांचे महत्व, त्याची गरज समजावली पाहिजे. मुलांना त्याची सवय लागल्यास, त्यांना रिलॅक्स वाटू शकेल.