ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ सुंदर मॉडेलला दोन वर्षांपासून आलीच नाही मासिक पाळी! महिलांना ‘ही’ सवय पडू शकते महागात…

जास्त झोपणे किंवा कमी झोपणे, या दोन्हीमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या माजी मिस टीन युनिव्हर्स राचेल फिंच ने मुलाखतीदरम्यान तिच्या प्रकृतीबद्दल धक्कादायक खुलासा केला. तीने सांगितले की, 12 तास झोपण्याच्या सवयीमुळे तिला खाण्याचा विकार झाला आणि दोन वर्षांपासून मासिक पाळी देखील आली नाही.

ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ सुंदर मॉडेलला दोन वर्षांपासून आलीच नाही मासिक पाळी! महिलांना ‘ही’ सवय पडू शकते महागात...
राचेल फिंच Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 9:40 PM

मुंबई : स्त्रियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, जसे की: नैराश्य, तणाव, लठ्ठपणा, तणाव, मधुमेह इत्यादी या शारीरिक समस्यांची अनेक कारणे असू शकतात. अलीकडेच ऑस्ट्रेलियन मॉडेल, माजी मिस टीन युनिव्हर्स (2006) आणि किस्ड अर्थची सह-संस्थापक राचेल फिंचने (Rachel Finch) एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, तिला 2 वर्षांपासून मासिक पाळी आली नाही. याचे कारण तिची चुकीची जिवनशैली (Wrong lifestyle) होती. या सवयीमुळे तिला खाण्याच्या विकारालाही सामोरे जावे लागले. मॉडेलिंगच्या सुरुवातीच्या टप्प्यात असताना तिला या समस्येचा सामना करावा लागला. राचेल सारख्या अनेक महिलांनाही ही सवय असू शकते, त्यामुळे आजपासूनच ही सवय सोडा. द मिररच्या वृत्तानुसार, राचेल फिंचने एका महिला मासिकाला (Women’s Magazine) ला मुलाखत देताना सांगितले की, मला अधिक वेळ झोपायची सवय असल्याने, मला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.

राचेल झोपत होती 12 तास

राचेल ने मुलाखती दरम्यान सांगीतले की, मला 12 तास झोपेची सवय होती. माझ्या या सवयीमुळे मी मॉडेलिंगच्या सुरुवातीच्या दिवसांत अतिशय अस्वस्थ परिस्थितीतून गेले. मला माझ्या अस्वस्थ प्रकृतीचे संकेत मिळू लागले कारण मी संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत झोपायचे. माझ्यासाठी हा धोक्याचा इशारा होता. 12 तासांच्या झोपेनंतर मला समजू लागले की काहीतरी चुकीचे आहे. 12 तासांच्या झोपेनंतरही मला थकवा जानवायचा. तसेच मला 2 वर्षांपासून मासिक पाळीही आली नाही. त्यावेळी माझे शरीरही हवे तसे काम करत नव्हते. मी शरीराला त्याच्या गरजेनुसार साचेबद्ध करू शकले नाही.

इंस्ट्राग्रामवर केली पोस्ट

राचेल ने इंस्ट्राग्रामवर पोस्ट करीत, आपल्या आरोग्याबाबत माहिती दिली आहे. तीने लिहीले आहे की, माझे वजन पूर्वी 57-58 किलो होते पण काही काळानंतर माझे वजन 52 किलो झाले. पण आज जर मी तो काळ आठवला तर त्या वेळी मी किती मोठी चूक केली होती असे मला वाटते. इटिंग डिसऑर्डर आणि लोकांना प्रेरित करण्याबद्दल बोलताना, राचेलने पहिल्यांदाच एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे तिच्या वैयक्तिक प्रवासाबद्दल सांगितले. कॅलरी मोजणे, ठराविक प्रमाणात खाणे आणि अधिक प्रशिक्षण घेतल्याने आरोग्य योग्य ठेवता येते, असे ती म्हणाली. मला आता पूर्वीपेक्षा हजार पटींनी बरे वाटत असल्याची प्रतिक्रीया तिने व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

वयाच्या 17 व्या वर्षी स्तन प्रत्यारोपण केले

राचेल ने सांगीतले की, मॉडेलिंगच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये म्हणजेच वयाच्या 17 व्या वर्षी माझे ब्रेस्ट ट्रान्सप्लांट झाले होते. पण 2021 मध्ये मी ते प्रत्यारोपण काढले आणि शस्त्रक्रियेनंतर मला पुन्हा बरे वाटू लागले आहे. प्रत्यारोपण काढून टाकल्यानंतर मला जितका आनंद झाला तितका कधीच झाला नाही. आता, माझे खरे रूप लोकांसमोर आहे. माझे शरीर माझे स्वतःचे आहे आणि ते माझ्यासाठी पुरेसे आहे.

जास्त झोपेमुळे खाण्यापिण्याचा विकार होतो

संशोधनात असे दिसून आले आहे की, कमी किंवा जास्त झोपेमुळे खाण्यापिण्याच्या विकार होऊ शकतात. बऱ्याच बाबतीत, जर एखाद्याला झोप येत नसेल तर तो अन्नाकडे धावतो. दुसरीकडे, कोणी जास्त झोपले तरी त्याला थकवा जाणवतो आणि तो अशक्तपणा दूर करण्यासाठी अन्नाकडे धाव घेतो. तज्ञ नेहमी 7-8 तास गाढ झोप आणि जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहार घेण्याची शिफारस करतात.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.