श्श्श्श… ‘हे’ पदार्थ अजिबात खाऊ नका, नाही तर हाडे ठिसूळ झालीच म्हणून समजा!
काही पदार्थ आहेत जे आपण आरोग्यासाठी चांगले मानून त्या पदार्थांचे (food items) अधिक सेवन करण्यास सुरवात करतो, ज्यामुळे आपल्यासाठी समस्या निर्माण होतात. या लेखात, आपण काही अशा पदार्थांबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात.
नवी दिल्ली: शरीर निरोगी (healthy body) ठेवण्यासाठी आपण खूप काही करत असतो, आरोग्याच्या गरजेनुसार खाण्या-पिण्यात अनेक बदल करत राहतो. पण असे काही पदार्थ आहेत जे आपण आरोग्यासाठी चांगले मानून त्या पदार्थांचे (food items) अधिक सेवन करण्यास सुरवात करतो, ज्यामुळे आपल्यासाठी समस्या निर्माण होतात. या लेखात, आम्ही आपल्याला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे हाडे ठिसूळ किंवा कमकुवत (Weak bone) होतात. जाणून घेऊया, ते कोणते पदार्थ आहेत.
कॅल्शिअम हे एक असे पोषक तत्व आहे जे शरीरात शोषले जाण्यास वेळ लागतो. असे काही पदार्थ आहेत जे प्रत्यक्षात शोषणास प्रतिबंध करतात, ज्यामुळे हाडांची शक्ती आणि त्यांची वाढ होण्यास अडथळा निर्माण होतो.
सॉफ्ट ड्रिंक हे हाडांसाठी अतिशय हानिकारक असते. त्याच वेळी, खूप जास्त ॲनिमल प्रोटीनदेखील हाडांच्या वाढीस अडथळा आणते. त्यामुळे शरीरातील कॅल्शिअम कमी होते.
चहा, कॉफी यांसारख्या पेयांमध्ये आढळणारे कॅफेन हे देखील शरीरातील कॅल्शिअम कमी करण्याचे काम करते. त्याच वेळी, धूम्रपान केल्याने आणि तंबाखू चघळण्यामुळेही निकोटीनचे सेवन केले जाते, ज्यामुळे कॅल्शियम शोषणाचे नकारात्मक परिणाम होतात.
अधिक प्रमाणात मीठ आणि साखरेचे सेवन केल्यानेही शरीरात कॅल्शिअमची कमतरता निर्माण होते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाडांच्या मजबुतीच्या दृष्टीने बॉडी फ्रेमलाही महत्त्व आहे. ज्या व्यक्तीच्या शरीरात कमी स्नायू असतात, ती व्यक्ती शरीरासाठी कमी कॅल्शिअम जमा करू शकते.