बाजरीच्या भाकरीसोबत कधीही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, फायदा नाही पण मोठे नुकसान
बाजरी हे आरोग्यदायी धान्य आहे. ती खाल्ल्याने वजन कमी होते. बाजरी मधून प्रथिने, फायबर सारखे आवश्यक पोषक घटक मिळतात. अनेक जणांना बाजरीची भाकरी खायला आवडते पण ती चुकीच्या गोष्टींसोबत खाणे नुकसानकारक ठरू शकते.
बाजरी हे एक भरड धान्य आहे. जे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे देते. पण बाजरी ही चुकीच्या पद्धतीने खाल्ली तर त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. बाजरीची भाकरी खाण्याची चुकीची पद्धत पोटासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. यामुळे पचन क्रिया बिघडू शकते. बाजरीची भाकरी काही पदार्थांसोबत खाणे वर्ज आहे. अशा पदार्थांसोबत बाजरीचे सेवन केल्याने ॲसिडिटी, बद्धकोष्टता, पोटदुखी, अस्वस्थता आणि इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बाजरीची भाकरी वजन कमी करण्यास मदत करते आणि शरीराला ताकद देते. जर तुम्हाला हिवाळ्यामध्ये बाजरीच्या भाकरी चे फायदे मिळवायचे असतील तर जाणून घ्या बाजरीची भाकरी खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ.
गरम पदार्थांसोबत खाणे टाळा
बाजरी ही मुळातच गरम असते बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीराला उब मिळते. त्यामुळे बाजरीच्या भाकरी सोबत इतर गरम पदार्थांचे सेवन करू नका. त्यामुळे पोटात जळजळ, पिंपल्स, ऍसिडिटी, पोट दुखी, जुलाब अशा समस्या उद्भवू शकतात. चिकन, मटन, तीळ या तिन्ही गोष्टीही उष्ण आहे. त्यामुळे या गोष्टी बाजरीच्या भाकरी सोबत खाणे टाळा.
पचायला चढ असणारे पदार्थ
हरभरा आणि राजम्यामध्ये उच्च प्रथिने असतात पण ते पचायला जड असतात. यासोबतच उडीद डाळही उशिरा पचते ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे त्यांनी या गोष्टींसोबत बाजरीची भाकरी खाणे टाळावे. कारण बाजरी मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. डॉक्टरांच्या मते आहारात जास्त प्रमाणात फायबर घेतल्याने गॅस, ब्लोटिंग आणि पोटात मुरड येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
तळलेले पदार्थ
बाजरीची भाकरी पचायला जसा वेळ लागतो, त्याचप्रमाणे तळलेले अन्न ही शरीरात लवकर पचत नाही. हे दोन्ही सोबत खाल्ल्याने ते पचनासाठी हानिकारक ठरू शकतात त्यामुळे हे सोबत खाणे टाळावे.
बाजरीची भाकरी खाण्याची योग्य पद्धत
बाजरीची भाकरी पचायला हलक्या असणाऱ्या गोष्टींसोबत खावी. कमी मसाले, मुगाची डाळ, हिरव्या भाज्या या पदार्थांसोबत बाजरीची भाकरी खाणे योग्य ठरेल. याशिवाय बाजरीची लापशी किंवा खिचडी खाणे ही उत्तम पर्याय आहे.
बाजरीची भाकरी खाण्याची योग्य वेळ
बाजरीची भाकरी कधीही खाऊ शकतो पण सकाळी आणि दुपारी कारणे जास्त फायदेशीर ठरेल. जर तुम्ही रात्रीच्या जेवणात बाजरीची भाकरी खात असाल तर झोपण्याच्या तीन ते चार तास आधी खा. रात्री पचन संस्था मंदावते त्यामुळे ऍसिडिटी, पोटदुखी, गॅस, उलट्या अशा समस्या उद्भवू शकतात.