‘या’ फळ आणि भाज्यांचे सॅलड तुमचा आहार बनविते परिपूर्ण… उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास होते मदत!
रोजच्या जेवनात हिरव्या भाज्या, फळभाज्यांपासून तयार केलेले सॅलडचा वापर केल्यास, तुमचा आहार पूर्ण होऊन, त्यातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात पोषणतत्वे मिळण्यास मदत होते. चला जाणून घेऊया, आहारात कोणत्या प्रकारचे सॅलड समाविष्ट केले जाऊ शकते.
खराब जिवनशैली आणि अस्वास्थ्यकर आहार यामुळे तरुण वयातच लोक उच्च रक्तदाबाच्या (Hypertension) समस्येला बळी पडत आहेत. उच्च रक्तदाबामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. अशा स्थितीत निरोगी जिवनशैली असणे अत्यंत आवश्यक आहे. आहारात तुम्ही अनेक प्रकारचे पदार्थ समाविष्ट करू शकता. पोटॅशियम आणि फायबरने (With potassium and fiber) समृद्ध असलेले पदार्थ तुम्ही आहारात समाविष्ट करू शकता. ते उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. अनेक हेल्दी सॅलड रेसिपी उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम करतात. आपल्या रोजच्या आहारात असे काही पदार्थ समाविष्ट करायला हवेत त्यामुळे आहारातील कमतरता भरून निघेल. यासाठी रोजच्या जेवनासोबतच रुचकर असे सॅलड (Delicious salad) आपण खाऊ शकतो ज्यामुळे, तुमचा आहार पूर्ण होतो.
मशरूम ची कोशिंबीर
मिक्सिंग बाऊलमध्ये 1 कप मशरूम, 1 चिरलेला कांदा, 1 चिरलेला टोमॅटो आणि उकडलेले हिरवे बीन्स घाला. आता ऑलिव्ह ऑईल, किसलेले लसूण आणि व्हिनेगर घालून ते चांगले मिसळा. हे मशरूम सॅलड चवीला आणि आरोग्यालाही उत्तम असते.
फळांचे सॅलड
मिक्सिंग बाऊलमध्ये दही घ्या. त्यात अर्धी वाटी खजूर, अर्धी वाटी मनुका आणि थोडीशी केळी घालून, ते चांगले मिसळा. त्यात बेरी, नाशपाती आणि संत्री या फळांच्या फोडी घालून, याचे सेवन करा. या सॅलडमध्ये भरपूर फायबर आणि पोटॅशियम असते.
रताळे आणि बीन सॅलड
मिक्सिंग बाऊलमध्ये 2 भाजलेले रताळे, वाफवलेले बीन्स, अर्धी ब्रोकोली, 1 गाजर, वाफवलेले काळे बीन्स, कॉर्न, अर्धा एवोकॅडो आणि सेलेरी घाला. ते चांगले मिसळा. त्यावर मीठ आणि मिरपूड घाला. मिक्स करून खायला घ्या.
काकडी आणि लसूण कोशिंबीर
हे सॅलड बनवण्यासाठी एका भांड्यात किसलेली काकडी ठेवा. यानंतर, स्मोक्ड आणि मॅश केलेला लसूण, टीस्पून सफरचंद सायडर व्हिनेगर आणि 2 चमचे पाणी घालून, ते चांगले मिसळा. त्यात पुदिन्याची पाने, मीठ, मिरपूड आणि थोडा मध घालून खायला घ्या. चवळीची कोशिंबीर हे हेल्दी सॅलड बनवण्यासाठी एका भांड्यात उकडलेली चवळी, 1 कप उकडलेला हिरवा मूग, 1 चमचा लिंबाचा रस, कांदा, 1 टोमॅटो, 2 टीस्पून भाजलेले जिरे, 1 टीस्पून आमचूर पावडर घाला. ते चांगले मिसळा आणि कोथिंबीरीने सजवा. सॅल्मन सॅलड एका भांड्यात शिजवलेल्या सॅल्मनचे 2 तुकडे घ्या. त्यात चिरलेली काकडी घाला. त्यात 1 चिरलेली सिमला मिरची, 1 छोटा एवोकॅडो आणि 1 कांदा घालून चांगले मिक्स करावे. आता २ चमचे ऑलिव्ह ऑईल, २ चमचे लिंबाचा रस, मीठ आणि मिरपूड घालून सॅलड चांगले मिसळा आणि जेवनासोबत खायला घ्या.