AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधुमेहींसाठी ‘हा’ ज्यूस वरदानापेक्षा कमी नाही, अवघ्या तीन तासांत दिसेल परिणाम

मधुमेह नियंत्रीत करण्यासाठी अनेकदा दमछाक होत असते. काहीही करुन रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात असतात. परंतु अवघ्या काही तासांमध्ये तुमची साखर नियंत्रणात येत असेल तर... तुम्हाला हे एकून विश्‍वास बसणार नाही. परंतु हे सहज शक्य आहे.

मधुमेहींसाठी ‘हा’ ज्यूस वरदानापेक्षा कमी नाही, अवघ्या तीन तासांत दिसेल परिणाम
मधुमेहाची समस्या
| Edited By: | Updated on: Feb 14, 2022 | 3:20 PM
Share

व्यायामाचा अभाव, बाहेरील अन्न (Food), फास्टफूड, आहारात संपूर्ण धान्य, हिरव्या भाज्या, फळे, आदींची कमतरता, बदलत्या जीवनशैली आदींमुळे भारतात मोठ्या प्रमाणात मधुमेहींची (Diabetics) संख्या वाढताना दिसत आहे. मधुमेहामुळे शरीरात रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करता येईल, असा आपला आहार असणे अत्यंत आवश्‍यक असते. मधुमेहींमध्ये (Diabetics) शरीरातील रक्तातील साखरेची पातळी खूप वाढते. जेवनानंतर शरीराला ग्लुकोज मिळत असते. या ग्लुकोजचा वापर पेशी शरीराला ऊर्जा देण्यासाठी करतात.

शरीरात इन्सुलिनच्या कमतरतेमुळे, ते त्यांचे कार्य योग्यरित्या करू शकत नाहीत, ज्यामुळे पेशींना ग्लुकोज मिळत नाही. हे ग्लुकोज आपल्या रक्तात जमा होऊ लागते. मधुमेहात शरीराला अन्नातून ऊर्जा निर्माण करणे शक्य होत नाही. परिणामी शरीरात ग्लुकोजचे प्रमाण वाढते. मग ते प्रमाण कमी करण्यासाठी विविध प्रकारे उपचार घ्यावे लागत असतात. परंतु तुम्ही घरबसल्या केवळ एक डाळिंबाचा ज्यूस (Pomegranate juice) पिऊनदेखील ग्लुकोज नियंत्रीत करु शकतात.

मधुमेहाचे साधारणत: तीन प्रकार आहे. टाइप 1 मधुमेह, टाइप 2 मधुमेह व गर्भावस्थेतील मधुमेह टाइप 2 च्या मधुमेहाचा विचार केल्यास यात आपल्या आहाराला महत्व असते. काही पदार्थांमध्ये ‘जीआय’पातळी खूप जास्त असते, ज्यामुळे शरीरातील ‘ग्लुकोज’चे प्रमाण वाढू लागते. ‘जीआय’ खाद्यपदार्थांमधील कार्बोहायड्रेटच्या प्रमाणाचे मुल्य आणि रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर त्यांचा होणारा प्रभाव यांचे मोजमाप होत असते. अशा काही गोष्टी आहेत ज्यात कमी जीआय पातळी आहे, त्यात डाळिंबाच्या रसाचादेखील समावेश होतो.

Express.co.uk यांच्याशी बोलताना आहारतज्ज्ञ रॉब हॉबसन यांनी सांगितले की, एका संशोधनानुसार, डाळिंबाचा रस केवळ 3 तासांत रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतो. पण अजूनही ते पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. डाळिंबाच्या रसामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी होते. स्नायू आणि यकृतातील पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देत नाहीत, रक्तात ग्लुकोज जमा होते तेव्हा ते खूप धोकादायक ठरू शकते. त्यामुळे शरीरातील पेशी मृत होत असतात. अशा परिस्थितीत, डाळिंबाचा रस मधुमेहासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

किती सेवन करावा

रॉब हॉब्सन यांच्या मते, दिवसातून एक ग्लास डाळिंबाचा रस पिणे फायदेशीर ठरू शकते. याशिवाय हॉबसन यांनी हेही सांगितले की, डाळिंबाच्या रसात भेसळ नसावी आणि तो पूर्णपणे शुद्ध असायला हवा. डाळिंबाच्या रसात अनेक प्रकारचे फ्लेवर्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यात पाणी आणि साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. दरम्यान, हा डाळिंबाचा रस मधुमेहावरील औषध असलेल्या ‘मेटफॉर्मिन’सोबत पिऊ शकता की नाही हे अभ्यासात आढळले नसल्याने ते पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

‘जर्नल एल्सेव्हियर’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी डाळिंबाचा रस सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. 12 तास उपाशी राहिल्यानंतर मधुमेहाचे 85 रुग्णांची रक्तचाचणी करण्यात आली. यानंतर त्यांना 1.5 मिली डाळिंबाचा रस दिल्यानंतर पुन्हा तीन तासांनंतर पुन्हा त्यांचे रक्तनमुने तपासण्यात आले. या नमुन्यात त्यांची रक्तातील साखर कमी आढळून आली. यासंदर्भात आजतकने सविस्तर रिपोर्ट दिला आहे.

(टीप : सदर मजकूर केवळ माहितीच्या आधारावर तयार करण्यात आला आहे, याला कुठल्याही प्रकारचा सल्ला समजू नये, अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

संबंधित बातम्या :  Constipation | तुमच्या चिमुरड्यांना बद्धकोष्ठाचा त्रास जाणवतोय? 4 घरगुती उपाय ठरतील परिणामकारक

स्त्रियांनो, लठ्ठपणामुळे त्रस्त आहात? लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजारावरील उपचारांविषयी जाणून घ्या

नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.