स्विच बोर्ड साफ करण्यासाठी या टिप्स करा फॉलो, सुरक्षेसह अवघ्या काही मिनिटांत होईल सफाई
घर साफ, स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. मात्र बऱ्याच वेळा आपण स्विच बोर्डकडे तेवढे नीट लक्ष देत नाही. ज्यामुळे स्विच बोर्ड अस्वच्छ आणि काळपट दिसायला लागतो. अशा वेळी अगदी साध्या , सोप्या उपायांनी स्विच बोर्ड सहज साफ करता येतो.
Tips and tricks: घरातील प्रत्येक व्यक्ती आपलं घर साप, स्वच्छ रहावे यासाठी प्रयत्न असते. मात्र बऱ्याच वेळेस घरातील काही कोपरे, उंच जागा , काही वस्तू अस्वच्छ राहतात. त्यापैकीच एक आहे, घरातील स्विच बोर्ड. त्याची नीट स्वच्छता करणे (Switch board cleaning), बऱ्याच जणांसाठी कठीण असते. त्यामुळे स्विच बोर्ड अस्वच्छ आणि काळपट (unclean and black) दिसायला लागतो. बरेच प्रयत्न केल्यानंतरही स्विचबोर्डवरील डाग, काळपटपणा जात नाही. खूप घासल्यानंतरही त्याची पुरेशी स्वच्छता होत नाही. काळे पिवळे डाग, साचलेली धूळ यामुळे स्विच बोर्डची सफाई करणे जिकीरीचे (difficulty in cleaning) काम होते. मुख्य म्हणजे स्विच बोर्डाची स्वच्छता करताना काही वेळेस शॉक (shock) लागण्याचा किंवा स्विच बोर्ड खराब होण्याचा धोकाही जाणवतो. अशा वेळी काही साध्या सोप्या उपायांनी स्विच बोर्डची सफाई करता येते व तो पूर्वीप्रमाणे, चमकदार आणि स्वच्छ दिसू लागतो.
पॉवर बंद करा
स्विच बोर्डाची सफाई करताना बऱ्याच वेळेस शॉक लागण्याचा धोका असू शकतो. असे झाल्यास ते जीवावरही बेतू शकते. त्यामुळे स्विच बोर्डाची स्वच्छता करायला घेण्यापूर्वीच घरातील इलेक्ट्रिसिटी अथवा पॉवर सप्लाय बंद करावा. त्याचबरोबर सफाई करताना हातात ग्लोव्ह्ज आणि पायात रबरी चप्पल न विसरता घालावी. त्यामुळे तुम्ही स्वच्छता करताना पूर्णपणे सुरक्षित रहाल.
व्हिनेगरचा वापर करा
स्विच बोर्डावर अनेक प्रकारचे डाग लागलेले असतात. तेल किंवा मसाल्याचे पडलेले डाग घालवण्यासाठी व्हिनेगरचा वापर करणे उपयोगी ठरू शकते. त्यासाठी एक कप पाण्यामध्ये 2 चमचे व्हिनेगर आणि 1 चमचा लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण नीट ढवळून वापरात नसलेला टुथब्रश किंवा कापड घेऊन त्या मिश्रणात बुडवून त्याने स्विच बोर्ड घासून घासून साफ करावा. यामुळे हट्टी डाग निघतील आणि स्विच बोर्ड नव्याप्रमाणे चमकेल.
या टिप्सचा वापर करून पहा
स्विच बोर्ड चमकवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा वापरही करू शकता. त्याशिवाय नेलपेंट रिमूव्हरच्या मदतीनेही स्विच बोर्ड सहज स्वच्छ होतो व चमकू लागतो. अल्कोहोल ( मद्य) वापरूनही स्विच बोर्डावरील घाण साफ करता येऊ शकते. त्यावरील डाग , पिवळेपणा घालवण्यासाठी ते मदतशीर ठरते.
पॉवर लगेच ऑन करू नका
स्विच बोर्ड साफ केल्यानंतर इलेक्ट्रिसिटी अथवा पॉवर सप्लायचे बटण लगेच ऑन करू नका. त्यामुळे शॉक लागण्याची भीती असते. किंवा शॉर्ट सर्किटही होऊ शकते. त्यामुळे स्वच्छता करून झाल्यानंतर स्विच बोर्ड पूर्णपणे वाळू द्या. 30-40 मिनिटांनंतर बोर्ड पूर्णपमे कोरडा झाला की मगच इलेक्ट्रिसिटी सप्लाय सुरू करा.
( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )