Thyroid Problem : थायरॉईडमुळे वजन वाढतंय?, मग हे कराच

थायरॉईडचा त्रास ज्यांना होतो, त्यांचे वजन अचानक वाढू लागते. मात्र हे वजन कमी करायचे असेल तर काही नियम कटाक्षाने पाळावेत. ज्यामुळे वजन तर घटेलच पण थायरॉईडच्या त्रासावरही नियंत्रण मिळवता येऊ शकेल.

Thyroid Problem : थायरॉईडमुळे वजन वाढतंय?, मग हे कराच
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 7:36 PM

धावपळीची जीवनशैली, चुकीची आहारपद्धती आणि व्यायामाच अभाव यामुळे आजकाल लोकांच्या मागे अनेक आजार लागले आहेत. आरोग्याच्या दृष्टीनेही अतिशय धोकादायक असते. त्याचे विपरीत परिणाम भविष्यात सहन करावे लागतात. घातक आजारांपैकीच एक आजार म्हणजे थायरॉईडची समस्या (Thyroid issue). थायरॉईड ग्रंथीतून (Thyroid Gland) निघणारे हार्मोन्स शरीरातल महत्वाच्या क्रिया नियंत्रित करतात. हे हार्मोन्स चयापचय क्रियेसाठी, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी, मेंदूच्या कार्यासाठी आणि हृदयाची क्रिया सुरळीत सुरू रहावी यासाठी मदत करतात. मात्र जेव्हा थायरॉईड ग्रंथीतून खूप जास्त किंवा खूप कमी प्रमाणात हार्मोन्स तयार होतात, तेव्हा थायरॉईडचा त्रास सुरू होतो. थायरॉईडचे हार्मोन्स कमी तयार झाले तर त्याला हायपरथायरोडिझम (Hyperthyroidism) म्हटले जाते. यामुळे केवळ मेटाबॉलिजमवर परिणाम होत नाही, तर त्यामुळे वजनही वेगाने वाढू लागते. मात्र हलकेफुलके व्यायाम आणि व्यवस्थित डाएट पाळणे, या दोन गोष्टी नियमित केल्या तर वजन कमी होऊ शकते.

खाली दिलेल्या उपायांनी वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.

साखर टाळा

थायरॉईडचा त्रास असेल तर साखर बिलकुल खाऊ नका. तसेच शर्करायुक्त पदार्थांपासूनही लांब रहा. जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात साखरेचे सेवन करत असाल तर तुमचे वजन कमी होणे कठीण होईल.

जेवणाचे प्रमाण कमी करा

तुम्ही दिवसातून 4 ते 5 वेळा खाल्लं तरी चालेल, पण त्याचे प्रमाण कमी ठेवा. जर तुम्ही दरवेळेस खूप जास्त पदार्थ, पोटभरून खाल्लं तर वजन कमी तर होणार नाहीच उलट अजून जास्त वाढेल. त्यामुळेच जेवताना ताटात प्रत्येक पदार्थ कमी प्रमाणात घ्या. मुख्य म्हणजे नाश्ता किंवा जेवण टाळू नका. त्याने भूक वाढते आणि आपण प्रमाणापेक्षा जास्त खातो.

हे सुद्धा वाचा

व्यायाम करा

दिवसातून थोडा वेळ तरी शरीराची हालचाल, व्यायाम होणे गरजेचे आहे. एकाच जागी बसून काम करणे, शरीराची जराही हालचाल न करणे यामुळे वजन आणखी वाढते. फार वेळ व्यायाम शक्य नसेल तर दिवसातील थोडा वेळ चालण्यासाठी तरी बाजूला काढा. शक्य तितकं चालत रहा

भरपूर पाणी प्या

दिवसभर थोडं-थोडं करून पाणी पीत रहा. पाण्याचे प्रमाण हळुहळू वाढवा. पाण्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. पचनशक्ती वाढते.

प्रथिनांचे सेवन करा

थायरॉईडचा त्रास असेल तर प्रथिनांचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शरीरातील कमकुवतपणा दूर होतो. त्याशिवाय वजन कमी करण्यातही प्रथिने महत्वाची भूमिका निभावतात.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.