कोणत्या लोकांचा हृदयविकाराचा झटका आल्यानंतरही मृत्यू होत नाही; ही गोष्ट माहीत असायलाच हवी
बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि नियमित व्यायाम नसणे यामुळे अनेकांना हार्ट अटॅक येतो. त्यामुळे अनेकांचा जीवही जातो. अत्यंत धडधाकट माणसंही चालताबोलता जातात. त्यामुळे अनेकांना धक्का बसतो. त्याचं जाण्याचं वय नव्हतं, असं आपण म्हणतो. पण काही लोकांना हृदयविकाराचा झटका आला तरी त्यांचा मृत्यू होत नाही. ही कोण लोकं असतात? ते काय काळजी घेतात?...
जगात हृदयविकाराचा धोका अधिकच वाढत आहे. हार्ट अटॅक, स्ट्रोक सारखे आजार हे जीवघेणे आहेत. त्यापासून वाचण्यासाठी खाणंपिणं, चांगली जीवनशैली आणि वर्कआऊट अत्यंत महत्त्वाचं आहे. जर हृदयविकार येणं हे कुटुंबात अनुवांशिक असेल किंवा कुटुंबात कोणी मधुमेह, कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर सारख्या समस्यांचा सामना करत असेल तर त्यांना फिजिकली फिट राहूनही हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यामुळे जीवही जाऊ शकतो. पण काही लोक असेही असतात की, त्यांना हृदविकाराचा तीव्र झटका येऊनही त्यांचा जीव वाचतो. असं कसं होतं?
कुणाचा जीव वाचतो
हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टची प्रकरणं सातत्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत ज्या लोकांना CPR मिळतो, त्यांचा जीव वाचवला जाऊ शकतो. सीपीआर म्हणजे कार्डियोप्लमोनरी रिससिटेशन ही एक लाइफ सेव्हिंग टेक्निक आहे. हार्ट अटॅक आल्यावर त्याचा वापर केला जातो. जर व्यक्तीच्या हृदयाचे ठोके थांबले तर रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी सीपीआर देणं त्यांच्यासाठी वरदान ठरतं.
सीपीआरने कसा वाचतो जीव?
एक्सपर्ट्सच्या मतानुसार, सीपीआर दिल्याने पेशंटला श्वास घेण्यास मदत होते. हृदय आणि मेंदूमध्ये ब्लड सर्कुलेशन वाढतं. अनेक प्रकरणात सीपीआरने जीव वाचू शकतो. त्यामुळे उपचारासाठी वेळ मिळतो. एका आकड्यानुसार सीपीआर दिल्याने 10 पैकी 4 लोकांचा जीव वाचू शकतो.
जे लोक डॉक्टरकडे नियमित जाऊन हृदयाची तपासणी करतात. आपल्या जीवनशैलीत बदल करतात, जास्त ताणतणाव घेत नाहीत. तसेच कोणत्याही व्यसनाच्या आहारी जात नाहीत. आणि सतत सकारात्मक राहतात अशा लोकांना शक्यतो हृदयविकाराचा झटका येत नाही. आला तरी तो जीवघेणा ठरत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपली स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. जास्त दगदग करता कामा नये.
या लोकांना हृदयविकारानंतर मृत्यूचा धोका कमी…
1. चपातीच्या ऐवजी बजारी, ज्वारी किंवा नाचणीची भाकर खाणाऱ्यांना
2. आंबे, केळी. चिकू सारखे गोड फळ कमी खाणारे, पपई, किवी आणि संत्र्यासारखे फळं कमी खाणाऱ्यांना
3. आठवड्यातून किमान 5 दिवस 45 मिनटे व्यायाम करा
4. वजन आणि लठ्ठपणा नियंत्रित ठेवणाऱ्यांना
5. लवकर झोपणे आणि लवकर उठण्याची रुटीन, सात तासाची झोप आवश्यक
6. धूम्रपान-अल्कोहलपासून दूर राहून हृदयविकारापासून वाचता येऊ शकतं
7. नियमितपणे हृदयाची तपासणी करून घेणाऱ्यांनाही हृदयविकाराचा धोका कमी असतो.