Insomnia: निद्रानाशाच्या समस्येने त्रासलात ? करा ‘हा’ उपाय
आरोग्य तज्ज्ञांच्या मते लेमन ग्रास म्हणजे गवती चहा घालून केलेला काढा अथवा चहा प्यायल्याने पचनसंस्था मजबूत होते. सर्दी, खोकल्यापासून आराम मिळतो. तसेच निद्रानाशाची समस्या असल्यास गवती चहाचा वापर करू शकतो.
नवी दिल्ली – खराब दिनचर्या, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी आणि तणाव यामुळे निद्रानाशाचा (insomnia) त्रास होतो. हा एक झोपेशी संबंधित विकार आहे. दीर्घकाळापासून निद्रानाशाची समस्या असेल तर त्याचा त्या व्यक्तीचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य (physical and mental health) या दोहोंवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे मनातील चिंता वाढते. सोप्या भाषेत सांगायचे निद्रानाशाची समस्या असलेली व्यक्ती ही मानसिकरित्या अस्वस्थ राहते. त्या व्यक्तीला बेचैन वाटत राहतं. या स्थितीमुळे इतर अनेक आजारांचा धोकाही वाढतो. निरोगी आयुष्य जगायचे असेल तर रोज किमान 7 ते 8 तास झोप घेतली पाहिजे, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. तुम्हालाही निद्रानाश होण्याचा त्रास असेल व या समस्येपासून मुक्ती हवी असेल तर तुम्ही लेमन ग्रास म्हणजेच गवती चहाचा (lemon grass) वापर करू शकता.
लेमन ग्रास म्हणजे काय ?
लेमन ग्रास म्हणजेच गवती चहा होय. हा एखाद्या गवताप्रमाणे दिसत असला तरी सामान्य गवतापेक्षा थोडा मोठा असतो. सामान्यतः गवती चहाचा वापर हा चहा बनवण्यासाठी आणि डासांपासून बचाव करण्यासाठी केला जातो.गवती चहा घालून केलेला चहा प्यायल्याने आरोग्यावर चांगला परिणाम होतो. तसेच घरात गवती चहाचे रोपटे लावल्याने डासांपासून बचाव करता येतो. त्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-फंगल आणि फोलेट हे गुणधर्म असतात. ते विविध आजारांवर फायदेशीर आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गवती चहा घालून केलेला काढा आणि चहा यांचे सेवन केल्यास पचनसंस्था मजबूत होते. सर्दी, खोकल्यापासून आराम मिळतो. तसेच ब्रेन पॉवरही वाढते. एवढेच नव्हे तर निद्रानाशाची समस्या असल्यास गवती चहाचा वापर करू शकतो. त्याच्या सेवनाने निद्रानाशाच्या समस्येत लवकर आराम मिळतो .
असा करा वापर
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार लेमन ग्रास म्हणजेच गवती चहामध्ये असे अनेक गुणधर्म असतात, जे निद्रानाश दूर करण्यास उपयुक्त ठरतात. लेमनग्रास तेलाचा वापर करून निद्रानाशाची समस्या दूर करता येते. यासाठी तुम्ही “इसेंशियल ऑईल थेरेपी”ची मदत घेऊ शकता. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही रोज सकाळी गवती चहा घातलेला चहा पिऊ शकता.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)