White Food | चरबी कमी करायची असेल तर ‘हे’ पांढरे पदार्थ आहारातून काढा बाहेर!
जगभरातील लोक सध्या लठ्ठपणाने त्रस्त आहेत. लठ्ठपणा हा एक प्रकारचा आजार म्हणून समोर येत आहे. लोकांचा चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे हे सर्व घडत आहे. लोक सतत लठ्ठपणाचे शिकार होत आहेत आणि दिवसरात्र ते या समस्येपासून मुक्त होण्याचा मार्ग शोधत असतात.
मुंबई: जंक फूड हे सर्वाधिक चरबीयुक्त आहे. खराब जीवनशैली आणि व्यायामाच्या अभावामुळे लोकांच्या पोटाची चरबी झपाट्याने वाढत आहे. खरं तर आहारात जंक फूडसोबतच आपण काही पदार्थांचेही सेवन करतो जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. यामध्ये व्हाईट फूड्सचा समावेश आहे. होय, आहारात पांढरे पदार्थ समाविष्ट केल्याने आपल्या लठ्ठपणाचा वेग वाढू शकतो. अशा तऱ्हेने चरबी कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी लोक जिमिंग करतात. पण इथे सांगितलेले हे पांढरे पदार्थ आपल्या आहारातून काढून टाकल्यास तुमचा लठ्ठपणा बऱ्याच अंशी कमी होईल. चला जाणून घेऊया…
1. भाताचे सेवन कमी करा
जर तुम्हाला पोटातील चरबी कमी होण्याची चिंता वाटत असेल तर सर्वप्रथम आपल्या आहारातून पांढऱ्या पदार्थांमधून भात काढून टाका. भात जास्त खायला आवडत असेल तर हळूहळू त्याचे प्रमाण कमी करा. खरं तर पांढरा तांदूळ आरोग्यासाठी चांगला मानला जात नाही. त्यामुळे आहारात ब्राऊन राईस खाण्याचा सल्ला आरोग्य तज्ञ देतात. कारण पांढरा तांदूळ पॉलिश केला जातो आणि त्यामुळे लठ्ठपणा झपाट्याने वाढतो.
2. व्हाईट ब्रेड
अनेकदा लोकांना सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये ब्रेड खायला आवडतं. अशावेळी ते प्रामुख्याने पांढऱ्या ब्रेडचे सेवन करतात. पांढऱ्या ब्रेडमुळे तुमच्या पोटाची चरबी झपाट्याने वाढते. त्यामुळे व्हाईट ब्रेडला आपल्या आहारातून वगळा. व्हाईट ब्रेडमुळे शरीरात कोलेस्टेरॉल जास्त असते. आहारात संपूर्ण गव्हाचा ब्रेड किंवा ब्राऊन ब्रेड समाविष्ट करण्यास सुरवात करा.
3. मैदा
जर तुम्ही लठ्ठपणाने त्रस्त असाल आणि मैद्यापासून बनवलेल्या गोष्टी सतत खात असाल आणि दुसरीकडे स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिममध्येही जात असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही. आपल्या आहारातून मैद्यापासून बनवलेल्या गोष्टी खाणे थांबवावे लागेल. खरं तर मैद्यापासून बनवलेल्या गोष्टी ज्या तेलात तळल्या जातात त्या लठ्ठपणा खूप वेगाने वाढवतात. मैद्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढवणारे गुणधर्म आहेत. त्यामुळे हे तुम्हाला फिट राहण्यास कधीच मदत करू शकत नाही.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)