Tomato flu: आता ‘टोमॅटो फ्लू’ची धास्ती; केरळमध्ये 80 हून अधिक मुले आजारी, पाच वर्षांखालील मुलांना जास्त धोका, जाणून घ्या लक्षणे

कोरोना, डेंग्यू नंतर लहान मुलांमध्ये टोमॅटो फ्लू ची प्रकरणे समोर आली आहेत. केरळमध्ये 'टोमॅटो फ्लू'ची (Tomato flu) प्रकरणे आढळल्याच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूने आपल्या सीमेवर पाळत ठेवली आहे. तामिळनाडू-केरळ सीमेवर तैनात असलेल्या अधिका-यांच्या पथकाने शेजारील राज्यातून येणाऱ्या लोकांची तपासणी केल्यामुळे कोइम्बतूरमध्ये फ्लूचे नाव पडले आहे.

Tomato flu: आता ‘टोमॅटो फ्लू’ची धास्ती; केरळमध्ये 80 हून अधिक मुले आजारी, पाच वर्षांखालील मुलांना जास्त धोका, जाणून घ्या लक्षणे
Tomato flu Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 5:14 PM

कोरोना महामारीच्या काळात एका नवीन आजाराने दार ठोठावले आहे. त्याला टोमॅटो फिव्हर किंवा टोमॅटो फ्लू (Tomato flu) म्हटले जात आहे. केरळमध्ये 80 हून अधिक मुले या आजाराच्या विळख्यात सापडली आहेत. यातील बहुतांश मुले पाच वर्षाखालील आहेत. जनरल फिजिशियन डॉ. मनिष मुनिंद्र यांच्या मते, टोमॅटो फ्लू हा व्हायरल इन्फेक्शन आहे. याचा प्रामुख्याने पाच वर्षांखालील मुलांना (Children under the age of five) होतो. या विषाणूजन्य संसर्गाला टोमॅटो फ्लू असे नाव देण्यात आले आहे कारण टोमॅटो फ्लूची लागण झाल्यावर मुलांच्या शरीरावर टोमॅटोप्रमाणे लाल रंगाचे पुरळ दिसून येते. यामुळे त्वचेवर जळजळ आणि खाज (Irritation and itching of the skin) सुटते. या आजाराची लागण झालेल्या मुलांनाही खूप ताप येतो. टोमॅटो फ्लूची लागण झालेल्या मुलांना डिहायड्रेशनची समस्या असते. यासोबतच शरीर आणि सांधे दुखण्याचीही तक्रार असते.

शेजारच्या राज्यातून येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यासाठी तमिळनाडू-केरळ सीमेवर असलेल्या चेकपोस्टवर महसूल, आरोग्य आणि पोलिस अधिकाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे. कोईम्बतूर जिल्ह्याने शिफ्टच्या आधारावर सीमेवर चोवीस तास लक्ष ठेवण्यासाठी तीन पथके तैनात केली आहेत. एखाद्याला ताप किंवा पुरळ यांसारखी लक्षणे दिसल्यास वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. लहान मुलांवर फ्लूचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याने अधिकारी जिल्हाभरातील अंगणवाडी केंद्रांची तपासणी करत आहेत आणि ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी आरोग्य अधिकार्‍यांसह जवळपास 24 मोबाईल टीम तैनात करण्यात आल्या आहेत. नए फ्लू

टोमॅटो फ्लूची लक्षणे

• निर्जलीकरण. • त्वचेवर पुरळ उठणे. • त्वचेची जळजळ किंवा खाज सुटणे. • टोमॅटोसारखे पुरळ आणि अंगावर पुरळ येणे. • उच्च ताप. • शरीर आणि सांधे दुखणे. • सांधे सुजणे. • पोटात पेटके आणि वेदना. • मळमळ, उलट्या आणि अतिसार. • खोकला, शिंका येणे आणि नाक वाहणे. • हाताच्या रंगात बदल. • कोरडे तोंड. • जास्त थकवा. • त्वचेची जळजळ.

हे सुद्धा वाचा

टोमॅटो फ्लूचे कारण?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, टोमॅटो फ्लूबद्दल अजून फारशी माहिती मिळालेली नाही. यावर अभ्यास सुरू आहे. बहुतांशी पाच वर्षांखालील मुले याला बळी पडत आहेत. दरम्यान, केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी एक निवेदन जारी केले आहे. ते म्हणाले, ‘हा आजार इतर मुलांपर्यंत पसरणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. हे खूप संसर्गजन्य आहे. हा फ्लू पाणी, श्लेष्मा, विष्ठा आणि फोडातील द्रव यांच्या थेट संपर्कातून पसरतो.

काय काळजी घ्याल

• संक्रमित मुलाला उकळलेले स्वच्छ पाणी द्या, जेणेकरून तो हायड्रेटेड राहू शकेल. • मुलास फोड किंवा पुरळ खाजण्यापासून प्रतिबंधित करा. • घर आणि मुलाच्या आजूबाजूला स्वच्छतेची काळजी घ्या. • कोमट पाण्याने आंघोळ करा. • बाधित मुलापासून अंतर ठेवा. • सकस आहार घ्या. • वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.