Tonsillitis : घशातील टॉन्सिलच्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नका..! अन्यथा उद्भवू शकते मोठी वैद्यकीय समस्या

घशाची किरकोळ समस्याही तुम्हाला खूप अस्वस्थ करू शकते. टॉन्सिल (टॉन्सिलिटिस) ही देखील एक सामान्य समस्या आहे ज्याने तुम्हाला कधी ना कधी त्रास दिलाच असेल. जाणून घ्या, टॉन्सिलच्या वेदनांबाबत संपूर्ण माहिती.

Tonsillitis : घशातील टॉन्सिलच्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नका..! अन्यथा उद्भवू शकते मोठी वैद्यकीय समस्या
TonsilsImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 7:16 PM

मुंबई : टॉन्सिल्स्‌ (टॉन्सिलिटिस) ही घशाच्या मागील बाजूस असलेल्या दोन अंडाकृती गाठींची (ऊतकांची) वेदनादायक स्थिती आहे. टॉन्सिलचे मुख्य कार्य (The main function of the tonsils) म्हणजे श्वासोच्छ्वासातून येणारे जिवाणू किंवा विषाणूंचा प्रतिबंध करणे होय. टॉन्सिलमध्ये असलेले अँटीबॉडीज घसा आणि फुफ्फुसाच्या संसर्गास प्रतिबंध करण्याचे कार्य करतात. तथापि, काही संसर्गजन्य परिस्थितीमध्ये, त्यांच्यावर सूज येते, ज्यामुळे खाणे आणि पिणे देखील कठीण होते. लहान मुलांमध्ये ही समस्या खूप सामान्य आहे. टॉन्सिल्सच्या जळजळ मुळे घसा खवखवणे, गिळण्यास त्रास (Difficulty swallowing) होणे, वेदना आणि ताप येऊ शकतो. ही समस्या कोणालाही होऊ शकते, ही समस्या लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये अधिक दिसून येते. जर, तुम्हाला टॉन्सिलिटिसचा त्रास वारंवार होत असेल तर या संदर्भात तज्ञांना भेटणे आणि स्थितीचे योग्य निदान (Correct diagnosis) करणे खूप महत्त्वाचे आहे. टॉन्सिलिटिसच्या समस्येबद्दल अधिक तपशीलवार जाणून घेऊया.

टॉन्सिल्स(टॉन्सिलिटिस)ची समस्या काय आहे?

मायोक्लिनिकच्या अहवालानुसार घशातील या ऊतींना विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे सूज येऊ शकते. टॉन्सिलिटिसचे मुख्य कारण म्हणजे स्ट्रेप्टोकोकस पायोजेनेस (ग्रुप ए स्ट्रेप्टोकोकस) नावाचा जिवाणू, ज्यामुळे स्ट्रेप थ्रोट देखील होतो. ही समस्या गंभीर नसली तरी नेहमीच्या उपचाराने ती बरी होऊ शकते, मात्र टॉन्सिलिटिसची समस्या वारंवार जाणवत राहिल्यास त्याबाबत तज्ज्ञांचे मत घेणे अत्यंत गरजेचे आहे.

टॉन्सिलिटिसची लक्षणे काय आहेत?

टॉन्सिलिटिसच्या स्थितीमुळे घशात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात, ज्याबद्दल सर्वांनीच विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे. सर्वसाधारणपणे, टॉन्सिलिटिसच्या बाबतीत अशा समस्या जाणवू शकतात.

  1. टॉन्सिलमध्ये सूज आणि लालसरपणा.
  2. टॉन्सिलवर पांढरे किंवा पिवळे डाग.
  3. घसा खवखवणे.
  4. गिळताना त्रास किंवा वेदना.
  5. ताप आणि डोकेदुखी.
  6. श्वासाची दुर्गंधी
  7. पोटदुखी

टॉन्सिलाईटिस कसा टाळायचा?

टॉन्सिलिटिसच्या बाबतीत, जळजळ सामान्य औषधांनी बरे होऊ शकते. तथापि, जर तुम्हाला अशा प्रकारची समस्या वारंवार येत असेल तर ते रोखणे खूप आवश्यक आहे. टॉन्सिलिटिस टाळण्यासाठी, तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. याशिवाय या गोष्टी लक्षात ठेवल्यास टॉन्सिलिटिसपासूनही बचाव होऊ शकतो.

>> हात स्वच्छ ठेवा जेणेकरून अन्नातून घशाचा संसर्ग होणार नाही. >> अन्न, पाण्याचे ग्लास किंवा बाटल्या कोणाशीही शेअर करणे टाळा. >> टॉन्सिलिटिसचे निदान झाल्यानंतर तुमचा टूथब्रश बदला. >> मुलांना जिवाणू किंवा विषाणूजन्य संसर्गापासून संरक्षण करण्याच्या उपायांबद्दल शिकवा. >> जर तुम्ही टॉन्सिलिटिसच्या स्थितीबद्दल अधिक संवेदनशील असाल, तर नक्कीच याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टॉन्सिलिटिस असल्यास काय करावे?

  1. टॉन्सिलिटिसच्या बाबतीत काही साधे घरगुती उपाय करूनही आराम मिळू शकतो.
  2. घशातील वेदना कमी करण्यासाठी अति थंड पदार्थांचे सेवन टाळा.
  3. तुमच्या खोलीत कूल-मिस्ट व्हेपोरायझर किंवा ह्युमिडिफायर वापरा.
  4. कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या करा.
  5. गळा शेकून सूज आणि वेदना कमी हेावु शकता.
  6. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुळीच औषधे घेवू नका.

भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू.
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी.
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस.
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?.
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात...
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात....
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप.
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव.
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.