Heart Health: अति तिथे माती! अति आनंद…मृत्यूस कारणीभूत! जाणून घ्या हॅपी हार्ट सिंड्रोमची लक्षणं ..

जास्त आनंदी राहणे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. अति आनंदामुळे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याला हॅपी हार्ट सिंड्रोम असे नाव आहे.

Heart Health: अति तिथे माती! अति आनंद...मृत्यूस कारणीभूत! जाणून घ्या हॅपी हार्ट सिंड्रोमची लक्षणं ..
Heart HealthImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 11:18 AM

नेहमी आनंदी रहावे, म्हणजे आपला दिवस चांगला जातो, आयुष्य वाढते, असे आपण नेहमी ऐकत आलो आहोत. पण हेच आनंदी राहणे, आपल्या जीवावर बेतू शकते, असे तुम्हाला कोणी सांगितले, तर तुमचा विश्वास बसेल का ? अति आनंदामुळे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, ( Too much happiness can kill people) अशी धक्कादायक माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. ‘हॅपी हार्ट सिंड्रोम’ ( Happy Heart Syndrome) असे त्याचे नाव असून त्याला ‘ताकोत्सुबो कार्डिओमायोपथी’ (Takotsubo Cardiomyopathy) असेही म्हटले जाते. जपानमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासातून हा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. मात्र हे नक्की काय आहे? आनंदामुळे कोणी जीव कसा गमावू शकेल, असे प्रश्न तुम्हाला पडले आहेत ना . त्याबद्दल जाणून घेऊया.

काय आहे हॅपी हार्ट सिंड्रोम ?

  • जपानमधील हिरोशिमा सिटी हॉस्पिटलमधील डॉ. हिकारू सातो व त्यांचे सहकारी, यांनी या सदर्भात अभ्यास करून काही निष्कर्ष काढले आहेत. अति आनंदामुळे होणारा मृत्यू याला हॅपी हार्ट सिंड्रोम अथवा ‘ताकोत्सुबो कार्डिओमायोपथी’ असेही म्हटले जाते. हा एक हृदयरोग आहे. अचानक तणाव आल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, मात्र त्याचे संकेत मिळत नाहीत.
  • एखादी व्यक्ती खूप आनंदात असताना त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हॅपी हार्ट सिंड्रोममध्ये, त्या व्यक्तीच्या हृदयाचे स्नायू कमकुवत होतात व त्यामुळे हृदयाच्या रक्त पंप करण्याच्या क्षमेतवर परिणाम होऊ शकतो. लग्न, नातवंडाचा जन्म, लॉटरीत जिंकणे यांसारख्या आनंदादायी घटनांमुळे ‘ताकोत्सुबो कार्डिओमायोपथी’ अथवा हॅपी हार्ट सिंड्रोम होऊ शकतो.
  • तसेच एखाद्या दु:खद घटनेमुळेही ( ब्रोकन हार्ट सिंड्रोम), हा त्रास होऊ शकतोच. अनपेक्षित आजारपण, धक्कादायक अपघात, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती, यामुळे बसलेला धक्का, या गोष्टीही ‘ताकोत्सुबो कार्डिओमायोपथी’ वा ब्रोकन हार्ट सिंड्रोम साठी कारणीभूत ठरू शकतात.
  • यादरम्यान 910 व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये हॅपी हार्ट सिंड्रोमच्या 37 केसेस आणि ब्रोकन हार्ट सिंड्रोमच्या 873 केसेस सापडल्या , ज्या ताकोत्सुबो कार्डिओमायोपथी साठी कारणीभूत ठरू शकतात. हॅपी हार्ट सिंड्रोम हा प्रामुख्याने पुरुषांमध्ये तर ब्रोकन हार्ट सिंड्रोम महिलांसाठी धोकादायक ठरत असल्याचे दिसून आले.

हॅपी हार्ट सिंड्रोमची लक्षणे कोणती?

छातीत दुखत राहणे तसेच तीव्र ताण येईल अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर श्वास लागणे, ही या सिंड्रोमची प्रमुख लक्षणे आहेत. यावर वेळेवर उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. हॅपी हार्ट सिंड्रोम व ब्रोकन हार्ट सिंड्रोमची लक्षणे एकसारखीच असतात.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.