नसेवर नस चढली? असह्य वेदना होतात? मग ‘हे’ उपाय नक्की करा
रक्तातील सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियमची कमतरता मॅग्नेशियमचे कमी प्रमाण, जास्त मद्यपान साखर किंवा पौष्टिक आहाराचा आभाव, जास्त ताण घेणे आणि चुकीचा असणात बसणे ही सर्व कारणे नसेवर नस चढण्याची असू शकतात.
Home Remedies Pinched Nerve Treatment : अनेकदा शरीरात नसेवर नस चढल्याचे पाहायला मिळते. नसेवर नस चढल्याने अनेकजण घाबरतात. पण ही अगदी सामान्यतः बाब आहे. मुख्यतः पायांमध्येही ही समस्या जास्त उद्भवते. परंतु हे शरीराच्या इतर कोणत्याही भागात होऊ शकते आणि कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकते. रक्तवाहिनीवर दाब पडल्यास किंवा रक्तवाहिनेत अडथळा निर्माण झाल्यास ही स्थिती उद्भवते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यस्त जीवनशैली आणि तणाव ही या मागची कारणे आहेत. नसेवर नस चढल्यावरती असह्य वेदनांना सामोरे जावे लागते.
नसेवर नस चढल्यास त्यावरील उपाय
मसाज : हलके मसाज केल्याने नसेवर नस चढण्यापासून आराम मिळू शकतो. आपण नारळ तेल किंवा ऑलिव्ह ऑइल वापरू शकतात. हे रक्त परिसंचरण वाढवण्यास मदत करते, यामुळे आराम मिळतो.
मीठ खाणे : सोडियमची कमतरता हे नसेवर नस चढण्याचे कारण असू शकते म्हणून त्यावेळेला थोडे मीठ चाटणे देखील फायदेशीर ठरू शकते.
पाय वर उचला : रक्तवाहिनीवर दाब पडल्यामुळे गंभीर स्थिती उद्भवली असेल तर नसा शांत करण्यासाठी पाय हळूहळू थोडा उचला. यामुळे रक्ताभिसरण वाढेल आणि तुम्हाला आराम मिळेल.
हलकी हालचाल आणि स्ट्रेचिंग : नसेवर नस चढल्यावर त्रास होतो तेव्हा त्या भागाला हळूवारपणे ताणण्याचा प्रयत्न करा. पण जेव्हा रक्तवाहिनीला त्रास होतोय असे जाणवेल तेव्हा लगेच थांबा.
थंड किंवा गरम पाण्याने शेका : थंड किंवा गरम पाण्याने शेकल्यास नसेवर नस चढलेल्या भागाला रक्तभिसरण सुरळीतरित्या होईल आणि यामुळे आराम मिळेल.
पाणी आणि हायड्रेशन : शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास नसेवर नस चढण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे आवश्यक तेवढे पाणी प्या.
ही समस्या कशी टाळावी?
१. शरीरात पाण्याची कमी भासू देऊ नका. २. झोपताना वारंवार तुमची नसेवर नस चढत असेल तर पायाखाली उशी ठेवून झोपा. ३. शरीरात पोटॅशियमची कमी होऊ देऊ नका. केळीमध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असते, त्यामुळे केळीचे सेवन करा. ४. या उपायांनी आराम मिळत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)