हिवाळ्यात पचनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

थंडीच्या दिवसांत बऱ्याच लोकांना पचनाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता, ज्यामुळे तुम्हाला पचनाच्या समस्यांपासून आराम मिळेल.

हिवाळ्यात पचनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 23, 2023 | 7:42 AM

नवी दिल्ली – हिवाळ्यात पचनाच्या समस्यांमुळे (digestion problem) अनेकांना त्रास होतो. त्यामुळे गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता (gas, acidity, constipation) यासारखा समस्या उद्भवू लागतात. यामुळे खूप अस्वस्थ वाटते तसेच वेदनाही होऊ शकतात. या दरम्यान, मेटाबॉलिज्मचे कार्यही हळूहळू सुरू असते. अनेकदा खराब जीवनशैलीमुळे (bad lifestyle might lead to digestion problems) पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवतात. पचनसंस्था निरोगी ठेवायची असेल तर तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता, ज्यामुळे तुमचे मेटाबॉलिज्म जलद होईल. तसेच पचनाशी संबंधित समस्यांपासूनही सुटका मिळेल.

प्रोसेस्ड पदार्थ

प्रोसेस्ड फूड किंवा प्रक्रिया केलेले अन्न पचवणे खूप कठीण असते. कारण त्या पदार्थांमध्ये फारच कमी फायबर असते. म्हणून, जर तुम्ही खूप प्रक्रिया केलेले अन्न खात असाल तर हळूहळ त्याचे सेवन कमी करा. त्याच्या अतिसेवनामुळे ॲसिडिटीची समस्या उद्भवू शकते.

हे सुद्धा वाचा

फायबरयुक्त पदार्थ

जर तुम्हाला वारंवार पचनासंबंधी समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात भरपूर फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. हे पदार्थ पचनसंस्था निरोगी ठेवतात. त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या टाळण्यास मदत होते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रासही दूर होतो. तुम्ही आहारात रास्पबेरी, स्ट्रॉबेरी, सफरचंद, गाजर, नासपत आणि बीट यांसारख्या पदार्थांचा समावेश करू शकता.

प्रोबायोटिक

तुमच्या आहारात प्रोबायोटिक पदार्थांचा समावेश करा. त्यात चांगले बॅक्टेरिया असतात. ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. तसेच त्यांच्यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यासही मदत होते. तुम्ही दही आणि कोकनट केफिर असे पदार्थ सेवन करू शकता.

बीटर फूड्स

केल, पालक, हळद, कारलं यांसारखे पदार्थ आवर्जून खावेत. हे पाचनतंत्रासाठी खूप उत्तम असतात, तसेच त्यामध्ये पोषक तत्वंही मुबलक प्रमाणात असतात. यातील काही पदार्थ कडू असतात खरं पण त्यांच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. ,

भरपूर पाणी प्यावे

प्रत्येक व्यक्तीने दररोज पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. हे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. दिवसातून किमान ७ ते ८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ म्हणजेच टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. तसेच पचनसंस्थाही निरोगी राहण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीचा त्रास होत नाही.

अन्न चावून खावे

अन्न खाताना त्याकडे संपूर्ण लक्ष देऊन, ते चावून चावून खावे. त्यामुळे अन्न सहज पचण्यास मदत होते. यामुळे पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत

Non Stop LIVE Update
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?.
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?.
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा.
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला.
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका.
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला.
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?.
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या....
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य.
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट.