Acidity : तुम्हाला सतत जळजळ, ॲसिडिटीचा त्रास होतो का ? आराम मिळवण्यासाठी प्या ही ड्रिंक्स

जास्त तळलेले, भाजलेले आणि मसालेदार अन्न खाल्ल्याने पोटात जळजळ आणि गॅसचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत काही पेयांचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Acidity : तुम्हाला सतत जळजळ, ॲसिडिटीचा त्रास होतो का ? आराम मिळवण्यासाठी प्या ही ड्रिंक्स
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 8:31 AM

नवी दिल्ली – बदलती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी (unhealthy eating habits) यामुळे आजकाल ॲसिडिटी होणे ही सामान्य समस्या झाली आहे. तेलकट आणि मसालेदार अन्न खाणे (eating spicy food) , झोप न लागणे, अवेळी जेवण करणे इत्यादींमुळेही पोटात जळजळ आणि गॅस होतो. जर तुम्हीही ॲसिडिटीच्या समस्येने (acidity problem) त्रस्त असाल तर काही पेयांचे सेवन केल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो. ही पेय कोणती व ती कसे तयार करावे हे जाणून घेऊया…

1) जिऱ्याचे पाणी

जिऱ्यामध्ये फायबर पुरेशा प्रमाणात आढळते. जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. जिऱ्याचे सेवन केल्याने तुम्हाला ॲसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळतो. यासाठी तुम्ही जिऱ्याचे पाणी पिऊ शकता. ते तयार करण्या एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात जिरे टाकून पाणी उकळावे. नंतर ते पाणी गाळून घ्या, कोमट झाल्यावर जिऱ्याचे पाणी तुम्ही पिऊ शकता.

हे सुद्धा वाचा

2) लिंबू व मधाचे पेय

लिंबामध्ये व्हिटॅमिन-सी आणि अंटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे पोटात असलेल्या बॅक्टेरियांशी लढा देतात. एका भांड्यात पाणी गरम करण्यास ठेवा, ते कोमट झाल्यानंतर त्यात लिंबाचा रस मिसळा. तसेच एक चमचा मधही मिसळा. हे पेय प्यायल्याने ॲसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होते.

3) बडीशेपेचे पाणी

बडीशेप आपल्या पचनसंस्थेसाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. बडीशेपेचे पाणी प्यायल्याने पोटातील जळजळ आणि गॅसची समस्या दूर होते. यासाठी पाण्यात बडीशेप मिसळून ते उकळावे. हे पाणी कोमट झाल्यावर तुम्ही ते पाणी पिऊ शकता. तुम्हाला हवे असेल तर रात्रभर बडीशेप पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या.

4) हिंगाचे पाणी

हिंग अन्नाची चव आणि सुगंध वाढवते आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते. हिंगाच्या पाण्याने गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. यासाठी अर्धा चमचा हिंग पावडर एक ग्लास कोमट पाण्यात मिसळा. या पेयाचे सेवन केल्याने तुम्हाला अॅसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

5) आल्याचे पाणी

आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आढळतात. जे पोटाची जळजळ आणि गॅसपासून मुक्त होण्यास मदत करतात. हे पेय बनवण्यासाठी आल्याचा तुकडा पाण्यात मिसळून उकळा. किंवा तुम्ही आलं किसूनही पाण्यात घालू शकता. पाणी कोमट झाल्यावर ते गाळून त्याचे सेवन करावे.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.