Ayurvedic Home Remedies: ॲसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी करून पहा हे घरगुती उपाय

अव्यवस्थित जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे बऱ्याच लोकांना ॲसिडिटीचा त्रास होतो. या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

Ayurvedic Home Remedies: ॲसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी करून पहा हे घरगुती उपाय
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 10, 2023 | 12:51 PM

नवी दिल्ली – लवकर निजे, लवकर उठे त्यासी आरोग्यसंपदा लाभे, ही म्हण आपणा सर्वांनाच माहीत तर आहे. पण आजकालच्या जीवनात कोणीही तसं वागताना दिसत नाही. रात्री उशीरा जेवण, काहीही खाणं, उशीरा झोपायचं की सकाळी उठायला हमखास उशीर.. परत पळत-पळत काम करायची.. अशी अनियमित दिनचर्या आजकाल प्रत्येकाची असते. अयोग्य खाणं-पिणं, जंक फूडची (junk food)आवड यामुळे बऱ्याच लोकांना आरोग्याच्या समस्या (health problems) भेडसावत असतात. त्यामध्येच एक समस्या म्हणजे ॲसिडिटी (acidity). बऱ्याच वेळेस जेवल्यानंतर अपचन, आंबट ढेकर येणे आणि उलटी होणे असे अनेक त्रास लोकांना होतात. ही सर्व ॲसिडिटीची लक्षणे आहेत. हा त्रास दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

तुळस

तुळशीमुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. तुळशीच्या पानांचे सेवन करू शकता. त्यामुळे पोटाची जळजळ कमी होण्यास मदत होईल. हे ॲसिडच्या समस्येपासून आराम देण्याचे काम करेल. यासाठी तुळशीची पाने पाण्यात उकळा. नंतर हे पाणी चहासारखे सेवन करा.

हे सुद्धा वाचा

कोमट पाणी

आयुर्वेदात पचन सुलभ करण्यासाठी कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही रोज कोमट पाण्याचे सेवन करू शकता. हे ॲसिड रिफ्लेक्सची लक्षणे कमी करण्यास मदत करते. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी घेऊ शकता.

गूळ

गुळामध्ये मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते. तुम्ही रोज गुळाचा एक छोटा खडा खाऊ शकता. गुळाचे सेवन केल्याने तुमचे आतडे निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे सूज येण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो. तसेच भूक न लागण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. हिवाळ्यात गुळाचे सेवन केल्याने तुमचे शरीर उबदार राहण्यास मदत होते. तसेच तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

ताक

दही वापरून ताक बनवले जाते. ताकामध्ये चांगले बॅक्टेरिआ असतात. त्यात लैक्टिक ॲसिड असते. हे ॲसिडटीच्या लक्षणांपासून त्वरित आराम देण्यास मदत करते. हे एक उत्कृष्ट प्रोबायोटिक आहे. त्याचा वापर तुम्हाला गॅस आणि ब्लोटिंगच्या समस्येपासून आराम देण्याचे काम करतो. यामुळे तुमची पचनसंस्था निरोगी राहते. म्हणूनच तुम्ही रोज नियमितपणे ताकही पिऊ शकता.

बडीशेप

बडीशेप ही माऊथ फ्रेशनर म्हणूनही वापरली जाते. याशिवाय अनेक स्वादिष्ट पदार्थांमध्येही याचा समावेश होतो. ॲसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही बडीशेपही खाऊ शकता. यामुळे गॅस, अपचन आणि पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. त्यामुळे आतडे निरोगी राहण्यास मदत होते. बडीशेपेच्या पाण्याचेही सेवन करू शकता. यासाठी पाण्यात थोडी बडीशेप उकळा. पाणी कोमट झाल्यावर ते गाळून सेवन करा.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.