Parenting : 3 वर्षांच्या मुलांना लावा स्वत:च्या हाताने खायची सवय, ‘ या ‘ टिप्सचा करा वापर
लहान मुलं जर स्वत:च्या हाताने खायला लागली तर त्यांच्या तब्येतीत फरक पडतो. तुमचं मुलही स्वत:च्या हाताने खात नसेल तर काही टिप्सचा वापर करून त्यांना स्वत:च्या हाताने खाण्याची सवय लावू शकता.
आपल्या मुलांना खाद्यपदार्थांमधून चांगलं पोषण (nutrition) मिळावं यासाठी प्रत्येक आई-वडील प्रयत्न करत असतात. बहुतांश पालकांना त्यांचं मूल अन्नपदार्थ स्वत:च्या हाताने कधी खायला (eating) लागेल याची चिंता असते. मूल 3 वर्षांचे झाल्यावर ही समस्या अधिक त्रासदायक असते. कारण या वयात मुलं खातात कमी आणि ते सांडतात, नासाडी जास्त करतात. किंवा कधीकधी मुलं खाण-पिणंही टाळतात. नीट न खाल्ल्यामुळे त्यांचं वजनही कमी (weight loss) होऊ शकतं. त्यामुळे मूल 3 वर्षांचे झाले की त्यांना स्वत:च्या हाताने खायची सवय लागणं अत्यंत गरजेचं आहे. लहान मुलं जर स्वत:च्या हाताने खायला लागली तर त्यांच्या तब्येतीत फरक पडतो. तुमचं मुलही स्वत:च्या हाताने खात नसेल तर काही टिप्सचा वापर करून त्यांना स्वत:च्या हाताने खाण्याची सवय लावू शकता.
लहान मुलं ही अनुकरणप्रिय असतात. आपण जे करतो, वागते, तसं वागण्याचा ते प्रयत्न करतात. त्यामुळे मुलांना जर स्वत:च्या हाताने खायची सवय लावायची असेल तर तुम्हालाही त्यांच्यासोबत बसून स्वत:च्या हाताने खावे लागेल.
त्यावेळी मुलांना कसे खावे, याची माहिती देता येईल. असे केल्याने ते तुमचे अनुकरण करत स्वत:च्या हाताने खायला सुरूवात करू शकेल.
मुलांना निरोगी ठेवण्यासाठी पालक असे पदार्थ बनवतात, ज्या हेल्दी आणि पौष्टिक असतात, पण त्यांना चव नसते. मुले असोत किंवा मोठ्या व्यक्ती, पदार्थाची चव आवडली नाही तरे तो पदार्थ खाणं टाळतात.
त्यामुळे मुलांना सेल्फ फीडिंगची सवय लावायची असेल, तर त्याच्यासाठी असे पदार्थ बनवा, जे आरोग्यदायी असतील पण चविष्टही असतील. अशा पदार्थांचे पर्याय तुम्ही ऑनलाइन शोधू शकता.
जर तुमचं मूल स्वत:च्या हाताने खात असेल आणि त्यावेळी त्याच्या हातून अन्न सांडले, तर त्याला समजवावे की खाली पडलेले अन्न खाऊ नये. बऱ्याच वेळेस पालक त्यांच्या कामात व्यस्त होतात आणि मुलं खाली पडलेले पदार्ख खाऊन टाकतात.
अशी वेळी त्यांना फायदा होण्याऐवजी त्रास होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मुलांना तुमच्यासोब बसवून खायला शिकवावे आणि अन्न खाली सांडल्यास, ते न खाण्याचा सल्लाही द्यावा.
( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)