मानसिक आरोग्य राखण्यासाठी तुळस आहे फायदेशीर, माहितेय का? वाचा

तुम्ही तुळशीची पाने अनेकदा खाल्ली असतील, पण आज जाणून घेऊया की जर तुम्ही रोज रिकाम्या पोटी एक ग्लास तुळशीचे पाणी प्यायले तर तुमच्या आरोग्यासाठी कोणते फायदे होतात.

मानसिक आरोग्य राखण्यासाठी तुळस आहे फायदेशीर, माहितेय का? वाचा
tulsi water
Follow us
| Updated on: Aug 20, 2023 | 7:49 PM

मुंबई: हिंदू धर्मात तुळशीचे झाड अत्यंत पवित्र मानले जाते. म्हणूनच आपण बहुतेक घरांमध्ये तुळशीचे रोप पाहू शकता. आयुर्वेदिक गुणधर्मांमुळे या वनस्पतीला खूप प्राधान्य दिले जाते. तुम्ही तुळशीची पाने अनेकदा खाल्ली असतील, पण आज जाणून घेऊया की जर तुम्ही रोज रिकाम्या पोटी एक ग्लास तुळशीचे पाणी प्यायले तर तुमच्या आरोग्यासाठी कोणते फायदे होतात.

तुळशीचे पाणी पिण्याचे फायदे

1.प्रतिकारशक्ती वाढते

तुळशीच्या पानांचे पाणी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. विशेषत: बदलत्या ऋतूत तुळशीच्या पाण्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो

2. डिटॉक्सिफिकेशन

जर आपल्या शरीरातील टॉक्सिन्स जास्त वाढले तर ते अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात, सकाळी उठल्याबरोबर तुळशीचे पाणी प्यायल्यास शरीर डिटॉक्स होईल.

3. कॅन्सर

तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात ज्यामुळे फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी होतो, यामुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका कमी होतो.

4. सर्दीचा धोका कमी

जे लोक रोज रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी पितात, त्यांना सर्दीचा धोका कमी असतो. ही रेसिपी शतकानुशतके आजमावून पाहिली जात आहे.

5. मानसिक आरोग्य चांगलं

तुळस मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानली जाते हे सर्वांनाच माहित नसते. याचे पाणी प्यायल्याने मन शांत राहते आणि तणाव आणि चिंता दूर होते

6. पचन चांगले होते

सध्याच्या युगात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी अतिशय अस्वास्थ्यकर झाल्या आहेत, ज्यामुळे आपल्या पोटाला त्रास सहन करावा लागतो. काहीही न खाता तुळशीचे पाणी प्यायल्यास पचन चांगले होते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, ॲसिडिटी कमी होते.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.