महिलांनाच नाही आता पुरुषांनाही ‘या’ आजाराने घेरलं, दुर्लक्ष करू नका, वेळीच उपचार घ्या!
आपल्या शरीरात अनेक भाग आहेत. ते त्यांचं कार्य करत असतात. त्यापैकीच एक यूरिनरी ट्रॅक्ट आहे. शरीरातील मूत्र बाहेर फेकण्याचं काम करतं. पुरुषांमध्ये किडनी जवळ हा भाग असतो. (Urine Infection In Men Symptoms Causes Risk Treatment)
नवी दिल्ली: आपल्या शरीरात अनेक भाग आहेत. ते त्यांचं कार्य करत असतात. त्यापैकीच एक यूरिनरी ट्रॅक्ट आहे. शरीरातील मूत्र बाहेर फेकण्याचं काम करतं. पुरुषांमध्ये किडनी जवळ हा भाग असतो. तिथेच मूत्राशय आणि यूरेथरा ही असते. युट्रेस दोन ट्यूब असते. त्यातूनच लघवीचं किडनीपासून ब्लॅडरपर्यंत वहन होतं. (Urine Infection In Men Symptoms Causes Risk Treatment)
युरेथ्रा ही एक सिंगल ट्यूब असते. मूत्राशयाद्वारे आपल्या लघवीला प्रोस्टेट आणि नंतर लिंगाच्या आतड्यांपर्यंत घेऊन जाते. अशावेळी तुमच्या यूरिनरी ट्रॅक्टमध्ये बॅक्टेरिया जमा झाल्यास तुम्ही संक्रमित होता. साधारणपणे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा प्रकार अधिक दिसतो. पुरुषातही ही लक्षणे दिसतात.
यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचे प्रकार
डॉक्टर यूरनरी ट्रॅक्टला (UTI) दोन पद्धतीने पाहतात. पहिला अप्पर आणि दुसरा लोअर. जेव्हा तुमच्या वरच्या भागात इन्फेक्शन होतं. तेव्हा किडनी किंवा मूत्रपिंडाची समस्या उद्भवते. दुसरीकडे लोअर संक्रमण झाल्यास ते प्रोस्टेट आणि ब्लॅडरमध्ये होतं.
UTIचे लक्षण
तुम्हाला इन्फेक्शन कुठे झाले आहे यावरून यूरिनरील ट्रॅक्ट इन्फेक्शनचे लक्षण ठरतात. त्याची लक्षण या प्रकारे आहेत.
वारंवार लघवीला येणं वारंवार लघवी आल्यासारखं वाटणं लघवी केल्यानंतर वेदना होणं, जळजळ होणं, अस्वस्थ वाटणं पोटाच्याखाली वेदना होणं अंथरुणातच लघवी करणं लघवीची दुर्गंधी येणं लघवीवाटे रक्त जाणं ताप येऊन घबराहट होणं हात किंवा पाठीच्या वरच्या भागात वेदना होणं
यूटीआयचं निदान
यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन समजण्यासाठी डॉक्टरांना तुम्हाला काही प्रश्न विचारतात. त्यानंतर यूरीन टेस्ट करून यूटीआयच्या समस्येचं निदान करतात. ही समस्या प्रोस्टेटशी संबंधित असेल तर तुम्हाला एक्सरे किंवा अल्ट्रा साऊंडही करावी लागू शकते. त्यातून तुमचा यूरनरी ट्रॅक्ट डॉक्टरांना समजू शकतो.
अँटीबायोटिक औषधांची मदत
तुमच्या आरोग्याची ताजी माहिती घेऊन डॉक्टर तुमच्या उपचाराची प्रक्रिया सुरू करतात. यूटीआयसाठी सामान्यपणे लोकांना अँटीबायोटिक औषधे दिली जातात. कमीत कमी एक आठवडा आणि अधिकाधिक दोन आठवड्यासाठी ही औषधे घ्यावी लागतात. अनेकदा अँटीबायोटिक आयव्हीद्वारे दिली जातात. मात्र, त्याचं प्रमाण खूप कमी आहे. अधिकाधिक लोकांना केवळ अँटिबायोटिक औषधांचं सेवनच करावं लागतं.
यूटीआयचं कारण जोखीम
मूत्राशयातील यूटीआयची समस्या हा तारुण्यातील आजाराशी संबंधित आजार आहे. क्लैमायडिया आणि गोनोरिया याचे मुख्य उदाहरण आहेत. तरुणांमध्ये ही समस्या सर्वाधिक असते. या शिवाय प्रोस्टेट प्रॉब्लेमच्या कारणानेही यूटीआयची समस्या निर्माण होते. एका ठरावीक वयानंतर पुरुषांमध्ये ही समस्या दिसून येते. वाढलेले प्रोस्टेट याला कारणीभूत आहेत. या समस्येमूळे मूत्र प्रवाह अवरुद्ध होऊ शकतो. त्यामुळे बॅक्टेरिया वाढला तर यूटीआयची समस्या वाढू शकते.
किडनीपर्यंत इन्फेक्शन वाढू शकतं
वेळीच यूटीआयच्या समस्येवर उपचार घेतला नाही तर हा आजार किडनीपर्यंत जाऊन पोहोचू शकतो. त्यानंतर किडनीवर उपचार करावा लागतो. मात्र, अत्यंत कमी प्रकरणात ही समस्या दिसून येते. मात्र, अनेकदा या आजारामुळे किडनी खराबही होऊ शकते. किडनीची समस्या निर्माण झाल्यास रक्ताचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे सेप्सिस होऊ शकतो. अशावेळी तुम्ही स्वत:ला आजारी समजू शकता. त्यामुळे वेळीच उपचार होणं आवश्यक आहे.
बचाव कसा कराल?
ही समस्या निर्माण होण्यापासून तुम्ही रोखू शकत नाही. मात्र, तुम्ही संबंध प्रस्थापित करताना सुरक्षेवर लक्ष ठेवल्यास या संसर्गापासून तुम्ही वाचू शकता. त्यामुळे यूटीआयचा धोकाही कमी होतो. या शिवाय तुम्ही प्रोस्टेटच्या समस्येचा इलाज केल्यावरही तुम्ही यूटीआयच्या समस्येपासून बचाव करून घेऊ शकता. (Urine Infection In Men Symptoms Causes Risk Treatment)
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 18 September 2021 https://t.co/JFFzyAPU8P #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 18, 2021
संबंधित बातम्या:
Yoga Poses : अॅसिडिटीची आणि पचनक्रियेची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ 5 योगासने दररोज करा!
Pregnancy Care :गर्भधारणेदरम्यान प्रत्येक स्त्रीच्या आहारात ‘या’ गोष्टी असणे आवश्यक!
खोकल्याचा आवाज ऐकून अॅप सांगणार आजार; अमेरिकन संशोधकांनी शोधलं नवा अॅप!
(Urine Infection In Men Symptoms Causes Risk Treatment)