वारंवार लघवी येणे असू शकते हाय ब्लड प्रेशरचे संकेत, लगेच घ्या डॉक्टरांचा सल्ला
रात्री 1-2 वेळेस लघवीला जावे लागणे हे सामान्य आहे, अनेकदा लोक रात्री जास्त पाणी पितात, त्यामुळे असे होते. पण तुम्हाला जर सतत लघवीला जावे लागत असेल तर काळजी घेणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली: लघवीचा रंग (बदलणे) आणि सतत लघवी (urine) लागणे, हे अनेक आजारांचे संकेत असू शकतात. सामान्यत: लघवीशी संबंधित लक्षणे ही किडनीच्या (kidney) आजाराचे संकेत असतात, मात्र असे प्रत्येक वेळेस असणे गरजेचे नाही. काही प्रकरणांमध्ये वारंवार लघवीची इच्छा होणे हे अन्य आजाराचे संकेत असू शकतात. रात्री 3-4 वेळा लघवीला जावे लागत असेल तर तुम्हाला सावधान राहण्याची गरज आहे. कारण हे ब्लड प्रेशरच्या (blood pressure) आजाराचे संकेत असू शकतात.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, रात्री 1-2 वेळेस लघवीला जावे लागणे हे सामान्य आहे, अनेकदा लोक रात्री जास्त पाणी पितात, त्यामुळे असे होते. पण तुम्हाला जर सतत लघवीला जावे लागत असेल तर त्याकडे लक्ष देऊन काळजी घेणे आवश्यक आहे. हे ब्लड प्रेशरच्या समस्येचे एक सुरुवातीचे लक्षण असू शकते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होणे याला वैद्यकीय भाषेत नोक्टूरिया म्हटले जाते. हा ब्लड प्रेशरच्या आजाराचा संकेत असू शकतो. त्याशिवाय मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजारांचेही संकेतही असू शकतात.
हाय ब्लड प्रेशरचा धोका 40 टक्क्यांपर्यंत असू शकतो
जागतिक आरोग्य संघटनेनुसार , रात्री 2 पेक्षा अधिक वेळेस लघवीला जावे लागणाऱ्या लोकांना हाय ब्लड प्रेशरचा (उच्च रक्तदाब) त्रास असण्याची 40 टक्के शक्यता असते. हाय ब्लड प्रेशरची इतर अनेक कारणे असली तरी हे देखील त्यापैकी एक कारण असू शकते.
हाय ब्लड प्रेशरची समस्या वेळीच ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, ही समस्या हृदयविकाराचे कारण बनू शकते. अशा परिस्थितीत, जर एखाद्या व्यक्तीमध्ये ही लक्षणे दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
ज्येष्ठ फिजिशियम डॉ. अजय कुमार सांगतात की, अनेक केसेसमध्ये लोकं लघवीची समस्या हा किडनीचा आजार समजतात आणि नेफ्रोलॉजिस्टकडून उपचार घेतात.
पण लघवीची समस्या असेल तर किडनीची तपासणी करण्याशिवाय, शरीराचा रक्तदाबही तपासणे गरजेचे आहे. रक्तदाब वाढला असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मधुमेहाचाही असतो धोका
डॉक्टर सांगतात की, जेव्हा किडनीमधील ग्लूकोजचे प्रमाण वाढते तेव्हा वारंवार लघवीला जायची इच्छा होते. हे मधुमेहामुळे असू शकते. त्यामुळे हा त्रास होत असेल तर रक्तातील साखरेचे प्रमाण तपासले पाहिजे.