Bhringraj Hair Oil : केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी लाभदायी ठरते घरी बनवलेले भृंगराज तेल, एकदा अवश्य करा वापर!

Bhringraj Hair Oil : घरी बनवलेले भृंगराज तेलाचा नियमित वापर केल्याने आपल्या केसांचे आरोग्य चांगले राहते. अकाली केसांना आलेले पांढरेपण, केस गळणे, केस तूटणे, केसांच्या मुळाशी इन्फेक्शन होणे यासारखे अनेक समस्या हे तेल दूर करते.

Bhringraj Hair Oil : केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी लाभदायी ठरते घरी बनवलेले भृंगराज तेल, एकदा अवश्य करा वापर!
Bhringraj Hair OilImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 8:53 PM

मुंबईः केसांचे आरोग्य चांगले व मजबूत राहण्याकरिता आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवलेल्या तेलाचा वापर करत असतो. तेलाचा वापर केल्याने आपले स्कल्प हायड्रेट होण्यासाठी मदत होते. तेलाच्या नियमित वापराने आपले केस कोमल मुलायम बनतात तसेच अनेकदा डोक्यामध्ये झालेला कोंडा सुद्धा तेलाच्या वापराने दूर होऊन जातो. नियमितपणे केसांना तेल लावल्याने स्कल्पचे ब्लड सर्क्युलेशन उत्तम राहते यामुळे केसांच्या मुळांना आराम मिळतो.केस ग्रंथींची वाढ देखील जास्त होते. केसांना तेल (Hair Oil) लावल्याने शरीरातील तणाव देखील दूर होतो. दिवसभर काम करून जेव्हा आपल्या शरीर थकलेले असते आणि रात्री झोपण्याच्या वेळी आपण जेव्हा एखाद्या तेलाने आपल्या केसांची मालिश करतो अशा वेळी आपल्याला झोप सुद्धा चांगली लागते. तेल लावल्याने आपल्या केसांच्या मुळांना मजबूत बनतात. केसांना नियमित तेल लावल्याने नैसर्गिक रित्या केसांना चमक प्राप्त होते. केसांचे आरोग्य मजबूत आणि सुदृढ बनविण्यासाठी आपण घरच्या घरी सुद्धा काही तेल बनवू शकतो. असेच एक तेल म्हणजे भृंगराज तेल(Bhringraj Hair Oil) . आपण घरच्या घरी सहजरित्या बनवू शकतो. हे तेल घरी (home made) कसे बनवायचे आणि या तेलाचे आपल्या केसांच्या आरोग्याच्या दृष्टीने नेमके काय काय फायदे असतात. हे आज आपण जाणून घेणार आहोत.

घरी अशा प्रकारे बनवा भृंगराज तेल

भृंगराज तेल बनवण्यासाठी आपल्याला भृंगराज पावडर किंवा भृंगराजची पाने, नारळाचे तेल किंवा तिळाचे तेल आणि मेथीच्या बिया लागतील .एका पातेल्यामध्ये नारळाचे तेल किंवा तिळाचे तेल टाका. आता या पातेला मध्ये आपल्याला भृंगराजची पाने किंवा पावडर टाकायची आहे. आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित उकळू द्यायचे आहे. जोपर्यंत या मिश्रणाचा रंग हिरवा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण उकळू द्यायचे आहे. या मिश्रणामध्ये मेथीचे काही दाणे टाका आता गॅस बंद करून हे मिश्रण काही काळ थंड होऊ द्या. या तेलाला गाळणीच्या सहाय्याने गाळून एका बॉटलमध्ये भरून ठेवा.

अशाप्रकारे भृंगराज तेल केसांना लावा..

घरी बनवलेल्या भृंगराज तेलाला 30 सेकंदासाठी गरम करा.या तेलात द्वारे 20 ते 30 मिनिटे आपल्या स्कल्प ची मालिश करा. हे तेल रात्रभर आपल्या डोक्यांना लावलेले असू उद्या. सकाळी उठल्यावर आपले केस एखाद्या शाम्पू च्या आधारे धुऊन टाका.

भृंगराज तेलाचा वापर करण्याचे फायदे

भृंगराज तेल नियमितपणे केसांना लावल्यास आपल्या केसांची वाढ लवकर होते. तुमचे केस गळत असतील तर केस गळण्याचे प्रमाण थांबते. आपल्या स्कल्प वर उपलब्ध असलेले फ्री रॅडिकल्स यांच्यासोबत लढण्यासाठी हे तेल मदत करते. आपल्या केसांच्या वाढीसाठी हे तेल लाभदायी ठरते.

भृंगराज तेल केस गळती थांबविते.भृंगराज तेलामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्व उपलब्ध असतात. या तेलात व्हिटॅमिन आणि मिनरल देखील असतात,जे आपले केस गळती पासून थांबवतात.

आपले लवकर केस पांढरे होत नाहीत.जर तुम्हाला वयाच्या आधीच केस पांढरे होण्याची समस्या सतावत असेल तर अशा वेळी या तेलाचा वापर अवश्‍य करायला हवा. या तेलाचा वापर केल्याने नैसर्गिक रीत्या आपल्या केसांना काळा रंग प्राप्त होतो. केस आपले पांढरे लवकर होत नाहीत.

संबंधित बातम्या

कोरोनातून लवकर बरे होण्यासाठी या गोष्टींचे सेवन करा, तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल!

शरीरात काही लक्षणं दिसताच करू नका दुर्लक्ष, वेळीच व्हा सावध, अन्यथा लिव्हर होऊ शकते खराब!

नेहमी थकल्यासारखं वाटतं? या वाईट सवयींमुळे बिघडते आरोग्य

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.