नवी दिल्ली : भारतात कोरोना संसर्गाचा वेग (CoronaVirus) काहीसा आटोक्यात येताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल (Lav Agrawal) यांच्या माहितीनुसार, 3 मे पासून रिकव्हरी रेट वाढत असून, सध्या रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 96 टक्क्यापर्यंत पोहोचला आहे. याशिवाय अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमालीची घटत आहे. 11 जून ते 17 जूनदरम्यान, 513 जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रेट 5 टक्क्यांपेक्षाही कमी राहिला. गेल्या 24 तासात देशात 62,480 नवे रुग्ण सापडले. महत्त्वाचं म्हणजे गेल्या 11 दिवसांपासून रुग्णसंख्या एक लाखांपेक्षा कमी दिसत आहे. (Vaccines Cut Hospitalisation Risk by 80%, Give 94% Protection Against Covid-19, Health Ministry)
दरम्यान, नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लस घेतलेल्या व्यक्तींना जरी कोरोनाची लागण झाली, तरी त्यांचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण हे 75-80 टक्क्यांपेक्षा कमी आहे. नव्या अभ्यासात हे समोर आलं आहे. इतकंच नाही तर लस घेतलेल्या रुग्णांना ऑक्सिजन देण्याचं गरज केवळ 8 टक्के इतकी आहे. तर अशा रुग्णांना ICU मध्ये ठेवण्याचं प्रमाण केवळ 6 टक्के इतकं आहे.
ग्रामीण भागात 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या रुग्णांना संसर्ग होण्याचा दर 56 टक्के तर 18 पेक्षा जास्त वयाच्या रुग्णांचं प्रमाण 63 टक्के इतकं आहे, अशी माहिती डॉक पॉल यांनी दिली. लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होत असला, तरी त्याचं प्रमाण कमी आहे.
We’ve been witnessing an increase in the recovery rate since May 3, which now stands at 96%. We are seeing a downward trend in active cases. Between June 11-June 17, the overall positivity case was less than 5% in 513 districts: Luv Aggarwal, Joint Secretary, Health Ministry pic.twitter.com/orilSiLVSl
— ANI (@ANI) June 18, 2021
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात हैदोस मांडला. आता तिसऱ्या लाटेचा अंदाज असून, लहान मुलांना बाधा होण्याची भीती आहे. त्या अनुषंगाने राज्य आणि केंद्र सरकार नियोजन करत असल्याचं, लव अग्रवाल यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या
साबरमती नदीच्या पाण्यातही कोरोना विषाणू आढळला, सर्व नमुने पॉझिटिव्ह, धाकधूक वाढली!
म्युकरमायकोसिसचा कहर, मुंबईत तीन मुलांनी गमावले डोळे, तर मुलीला डायबेटिसची लागण