वजन कमी करण्यासाठी प्या ‘या’ भाज्यांचं सूप!
भाज्यांचे सूप प्यायल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते. अन्न खाण्यापूर्वी भाज्यांचे सूप प्यायल्यास अन्न पचण्याबरोबरच वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. इथे आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी कोणत्या भाज्यांचे सूप प्यावे हे सांगणार आहोत.
मुंबई: व्हेजिटेबल सूप शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. ते प्यायल्याने वजन कमी होते. इतकंच नाही तर भाज्यांचे सूप प्यायल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते. अन्न खाण्यापूर्वी भाज्यांचे सूप प्यायल्यास अन्न पचण्याबरोबरच वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. इथे आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी कोणत्या भाज्यांचे सूप प्यावे हे सांगणार आहोत.
वजन कमी करण्यासाठी प्या ‘हे’ सूप
फ्लॉवर सूप –
फ्लॉवर सूप बनवण्यासाठी एका पॅनमध्ये थोडे तेल घ्या. त्या तेलात कांदा, हिरवी मिरची आणि चिरलेली फ्लॉवर घालून हलके शिजवावे, मग त्यात कमी पाणी घालून सर्व गोष्टी थोडा वेळ उकळू द्याव्यात. आता सूप थंड झाल्यावर मिक्सरमध्ये हलके ब्लेंड करावे. आता या सूपमध्ये कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
बीटरूट सूप –
बीटरूट सूप बनवण्यासाठी कुकरमध्ये थोडे तेल टाकावे, तेल गरम झाल्यावर त्यात कांदा, टोमॅटो आणि बीटरूट घालून हलके परतून घ्यावे. त्यानंतर पाणी टाकून झाकण लावा आणि शिट्टी घ्या. थंड झाल्यावर ते सगळं हलकेच मिक्स करा. आता कढईत घालून चवीपुरते मीठ आणि काळी मिरी घालून मिक्स करा. आता त्याचे सेवन करा.
दुधी भोपळ्याचे सूप –
भोपळा सूप बनवण्यासाठी एका कढईत तेल घालून कांदा आणि टोमॅटो तळून घ्या. नंतर त्यात चिरलेली दुधी घालून पाणी मिसळावे, ते सर्व थोडा वेळ शिजू द्यावे, त्यात मीठ आणि काळी मिरी घालावी. आता हे सूप थंड झाल्यावर मिक्स करा. त्यात लिंबाचा रस घालून दुधीचे सूप सर्व्ह करावे.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)