Vitamin B deficiency: ‘व्हिटॅमिन बी-12’ ची गंभीर कमतरता दर्शवतात ही पाच लक्षणे; जाणून घ्या, यामुळे शरीरावर काय परिणाम होतात

शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 खूप महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरात हे जीवनसत्त्व तयार होत नाही आणि त्यासाठी व्हिटॅमिन बी-12 भरपूर असलेले पदार्थ खाणे आवश्यक आहे. जर शरीरात त्याची कमतरता असेल तर अनेक आजार तुम्हाला घेरतात.

Vitamin B deficiency: ‘व्हिटॅमिन बी-12’ ची गंभीर कमतरता दर्शवतात ही पाच लक्षणे; जाणून घ्या, यामुळे शरीरावर काय परिणाम होतात
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 6:56 PM

जीवनसत्त्वांची कमतरता (Vitamin deficiency) असताना आपले शरीर अनेक संकेत देते, जे वेळीच समजून घेतल्यास संकट टाळता येऊ शकते. धावपळीच्या जीवनात व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता ही लोकांमध्ये एक सामान्य समस्या आहे. भारतात करोडो लोक या आजाराचे बळी आहेत. आकडेवारीनुसार, भारतातील किमान 47 टक्के लोक बी-12 च्या कमतरतेने ग्रस्त आहेत आणि फक्त 26 टक्के लोकांमध्ये त्याची पातळी योग्य असल्याचे आढळून आले आहे. हा धक्कादायक डेटा भारतीय लोकसंख्येमध्ये व्हिटॅमिन बी-12 (Vitamin B-12) च्या कमतरतेबद्दल चेतावणी देणारा आहे.

व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता सुरवातीला किरकोळ वाटू शकते. परंतु दीर्घकाळपर्यंत त्याची कमतरता शरीराला खूप नुकसानकारक (Very damaging) ठरते. व्हिटॅमिन बी 12 शरीरातील लाल रक्तपेशी, डीएनए तयार करण्यास मदत करते. याशिवाय मेंदू आणि मज्जातंतूंच्या पेशी मजबूत करते. त्याच्या कमतरतेमुळे अॅनिमियाचा धोका वाढतो. व्हिटॅमिन बी-12 शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यात कोबाल्ट असते जे इतर जीवनसत्त्वांमध्ये आढळत नाही. पुरुषांनी दररोज 2.4 मायक्रोग्रॅम आणि महिलांनी 2.6 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन बी-12 चे सेवन केले पाहिजे. जर एखाद्यामध्ये त्याची कमतरता असेल तर त्यावर प्रभावी उपचार केले पाहिजेत.

व्हिटॅमिन बी 12 काय करते

व्हिटॅमिन बी-12 शरीरातील चेतापेशी (Nerve Cells) आणि रक्त पेशी(Blood Cells) निरोगी ठेवण्यास मदत करते. तसेच डीएनए (DNA)बनवण्यास पूरक असते. शरीर स्वतःहून व्हिटॅमिन बी-12 बनवत नाही, ते अन्नातून घ्यावे लागते. व्हिटॅमिन बी 12 अंडी, मांस आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळते. यासोबतच हे काही तृणधान्ये, ब्रेड आणि यीस्टमध्येही आढळते.

हे सुद्धा वाचा

व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे त्वचा, डोळ्यांच्या समस्यांसह न्यूरोलॉजिकल विकार होतात. त्यामुळे या कमतरतेकडे निर्देश करणाऱ्या सर्व लक्षणांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. यूकेच्या सरकारी आरोग्य एजन्सी NHS ने व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेच्या काही लक्षणांबद्दल माहिती दिली आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही हे जाणून घेऊ शकता की. तुम्हालाही या कमतरतेचा त्रास आहे की नाही.

व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेची ही मुख्य लक्षणे

– त्वचेचा फिकट रंग – जीभ दुखणे आणि काळे ठिपके – तोंड येणे, तोंडात फोड येणे – दृष्टी क्षीणता – चिडचिड – नैराश्य

शास्त्रज्ञांच्या मते, व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकते. परंतु वृद्धांना त्याचा अधिक त्रास होतो. तसेच, जे शाकाहारी आहेत, त्यांच्यासाठी पुरेसे व्हिटॅमिन बी-12 अर्जित करणे खुपच कठीण असते.

कमतरता टाळण्यासाठी काय खावे

व्हिटॅमिन बी-12 हे एक पोषक तत्त्व आहे जे शरीरात नैसर्गिकरित्या तयार होत नाही. त्यामुळे हे शरीराला याचा पुरवठा करण्यासाठी हे जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असलेले पदार्थ खाणे आवश्यक आहे. यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही काही सप्लिमेंट्स घेऊ शकता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.