Migraine: व्हिटॅमिन बी-2 मुळे मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम; जाणून घ्या आणखी कोणत्या सप्लीमेंट्स फायदेशीर
मायग्रेनचा आजार हा अनुवांशिक असतो. मात्र बऱ्याच वेळेस डिहायड्रेशन, स्ट्रेस (तणाव) आणि आहारातील घटक हे देखील मायग्रेनसाठी कारणीभूत ठरू शकतात. वारंवार होणाऱ्या मायग्रनेच्या त्रासामुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते.
नवी दिल्ली: मायग्रेन (Migraine) हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये डोकं दुखणं (headache) आणि चक्कर येणं ही सामान्य गोष्ट ठरते. मायग्रेन ही एक अशी न्यूरॉलॉजिकल कंडीशन आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या डोक्याचा एक भाग किंवा कधीकधी दोन्ही भागांत तीव्र वेदना होतात. या वेदनांचा कालावधी काही तास किंवा (कधीकधी) अनेक दिवसांपर्यंत राहू शकतो. मायग्रेनचा आजार हा अनुवांशिक असतो. मात्र बऱ्याच वेळेस डिहायड्रेशन, स्ट्रेस (तणाव) (stress) आणि आहारातील घटक (food habits) हे देखील मायग्रेनसाठी कारणीभूत ठरू शकतात. वारंवार होणाऱ्या मायग्रनेच्या त्रासामुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते. यामुळे, मायग्रेनच्या उपचारांसाठी सप्लीमेंट्स किंवा नैसर्गिक थेरपी खूप लोकप्रिय होत आहे. व्हिटॅमिन बी 2 आणि मेलाटोनिन यांसारखे पोषक घटक मायग्रेनचा ॲटॅक रोखण्यात खूप प्रभावी ठरत आहेत. कोणती व्हिटॅमिन्स ( जीवनसत्त्वे) आणि मिनरल्स (खनिजे) मायग्रेनपासून आराम देऊ शकतात हे जाणून घेऊया.
व्हिटॅमिन बी 2
हेल्थलाइन नुसार, शरीरातील व्हिटॅमिन बी 2 हे बऱ्याच मेटाबॉलिक (चयापचय) प्रक्रियेमध्ये मदत करते. हे जीवनसत्व पाण्यात विरघळणारे असून मायग्रेनचा विकास रोखण्यासाठी ते खूप प्रभावी ठरते. व्हिटॅमिन बी 2 मुळे पेशींना ऊर्जा मिळते. बऱ्याच वेळेस मेंदूच्या नसा सुस्त होतात, ज्यामुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.
मॅग्नेशिअम
मज्जातंतूंचे कार्य, रक्तदाब आणि स्नायूंचे कार्य सुरळीत चालावे यामध्ये मॅग्नेशियमची प्रमुख भूमिका असते. मॅग्नेशियमची कमतरता असेल तर डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या उद्भवू शकते. मॅग्नेशियम सप्लीमेंट्स घेतल्याने मायग्रेनमुळे होणाऱ्या वेदना दूर होऊ शकतात.
व्हिटॅमिन डी
शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर मायग्रेनचा ॲटॅक येऊ शकतो. मेंदूमध्ये होणाऱ्या इन्फ्लेमेशनशी व्हिटॅमिन डी लढा देते. त्याशिवाय व्हिटॅमिन डी हे मॅग्नेशिअम शोषले जाण्याची गती वाढवते. आणि मायग्रेनच्या ॲटॅक दरम्यान वाढणाऱ्या घटकांचे उत्पादन कमी करते. व्हिटॅमिन डी चे नियमित सेवन केल्यास मायग्रेनपासून संरक्षण होऊ शकते.
( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)