Vitamin C Deficiency: ही 2 फळे खाऊन दूर होईल Vitamin C ची कमी, बदलत्या वातावरणात सुद्धा होणार नाहीत आजार!
आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे जेणेकरून संसर्गाचा धोका कमी होईल. कोरोनाचा काळ सुरू असताना रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर देण्यात आला होता. सामान्य दिवसातही ही गोष्ट महत्त्वाची असते कारण संसर्गजन्य आजारांची भीती नेहमीच असते.
मुंबई: हिवाळ्यात संसर्ग आणि आजारांचा धोका लक्षणीय वाढतो, विशेषत: सर्दी, खोकला आणि ताप. त्यासाठी आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे जेणेकरून संसर्गाचा धोका कमी होईल. कोरोनाचा काळ सुरू असताना रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर देण्यात आला होता. सामान्य दिवसातही ही गोष्ट महत्त्वाची असते कारण संसर्गजन्य आजारांची भीती नेहमीच असते.
Vitamin C असलेली फळे
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि इन्फेक्शनमुळे होणारे आजार टाळण्यासाठी आपण आंबट फळांशी मैत्री केली पाहिजे कारण त्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती प्रचंड वाढते. व्हिटॅमिन सी ची औषधे बाजारात उपलब्ध असली तरी नैसर्गिक पद्धत नेहमीच चांगली असते. चला तर मग जाणून घेऊयात व्हिटॅमिन सी ने समृद्ध असणारी 2 फळे कोणती आहेत.
1. संत्रा
हे एक अतिशय सामान्य फळ आहे, ते खाण्यास थोडे आंबट आहे, परंतु तरीही बऱ्याच लोकांना ते आवडते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात आणि फ्री रॅडिकल्सपासून आपले संरक्षण करतात. यामुळे हिवाळ्यातील आजार तर दूर होतातच, शिवाय कॅन्सरपासूनही बचाव होतो. आपण ते थेट खाऊ शकता, काही लोक त्याचा रस पितात.
2. किवी
हे महागडे फळ आहे, परंतु त्यात संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते, म्हणून त्याला इम्युनिटी बूस्टरचा दर्जा देखील दिला जातो. तसेच हे खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारची पोषक तत्वे मिळतात, ज्यामुळे सर्दी, खोकला, डेंग्यू सारख्या आजारांपासून बचाव करणे सोपे जाते. त्यामुळे किवीचे नियमित सेवन करणे अत्यंत गरजेचे आहे.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)