AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केवळ लिंबू, संत्र्यामध्येच नाही तर ‘या’ फळांमध्ये देखील आढळते व्हिटॅमिन सी, फायदे जाणून घ्या

व्हिटॅमिन सीचे (vitamin C) अनेक फायदे आहेत. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अनेक जण व्हॅटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा आपल्या आहात नियमित समावेश करतात.

केवळ लिंबू, संत्र्यामध्येच नाही तर 'या' फळांमध्ये देखील आढळते व्हिटॅमिन सी, फायदे जाणून घ्या
व्हिटॅमिन सीचे स्रोत
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 5:40 AM

व्हिटॅमिन सीचे (vitamin C) अनेक फायदे आहेत. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अनेक जण व्हॅटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा आपल्या आहात नियमित समावेश करतात. व्हिटॅमिन-डी (vitamin D) प्रमाणे, मानवी शरीर व्हिटॅमिन-सी तयार करू शकत नाही किंवा साठवू शकत नाही, म्हणून त्याचे योग्य प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन-सी अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असते. त्वचेच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सीचा उपयोग होते. रक्तवाहिन्या, हाडे आणि दातांसाठी देखील व्हिटॅमिन सीची आवश्यकता असते. सर्वसामान्यपणे अनेक लोकांना असे वाटते की, लिंबू आणि संत्र्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन-सी असते. हे सत्य देखील आहे, लिंबू आणि संत्री ही सी व्हिटॅमिनचे सर्वात चांगले स्त्रोत आहेत. मात्र या व्यतिरिक्त देखील अनेक फळात व्हिटॅमिन सी आढळून येते. आज आपण अशाच काही पदार्थांबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

अननस : अनेकांना अननसाचे ज्यूस आवडते, तर काहींना या फळाचे काप खायला आवडतात. अनन हा व्हिटॅमिन-सीचा उत्कृष्ट स्रोत आहे. अननसाच्या सर्व्हिंगमध्ये 79 मिलीग्राम व्हिटॅमिन-सी असते. याव्यतिरिक्त, अननसाचे नियमित सेवन केल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रित राहाते.

पपई: पपई हे फळ फायबरचा समृद्ध स्रोत आहे. सोबतच पपईमध्ये व्हिटॅमिन सी देखील मोठ्या प्रमामात आढळून येते. एक कप पपईमध्ये 88 मिलीग्राम व्हिटॅमिन-सी असते.

पेरू: पेरू हे साधारणपणे हिवाळ्याच्या हंगामात उपलब्ध होणारे फळ आहे. पेरूचा आहारात समावेश करण्याचे अनेक फायदे आहेत. पेरू हा फायबर आणि कार्बोहायड्रेट्सचा उत्तम स्त्रोत आहे. सोबतच पेरूमध्ये व्हिटॅमिन सी देखील मोठ्याप्रमाणात आढळून येते. त्यामुळे पेरूचा आहारात नियमित समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

किवी : हे एक गडद हिरव्या रंगाचे फळ असते. किवीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळून येते. तसेच किवीच्या नियमित सेवनामुळे शरिरातील साखरेचे प्रमाणात देखील नियंत्रित राहाते. त्यामुळे ज्या व्यक्तींना मधुमेहाचा त्रास आहे, अशा व्यक्तींना किवीचे फळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

टीप : वरील माहिती ही केवळ सामान्यज्ञानाच्या उद्देशाने देण्यात आली असून, डायट प्लॅन ठरवताना तज्ज्ञाचा सल्ला आवश्य घ्यावा.

संबंधित बातम्या

बदलत्या ऋतूत पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम हवाय?, मग ‘या’ पदार्थांचे सेवन आवश्य करा

आजार अनेक उपाय एक! जिऱ्याचे हे औषधी गुणधर्म तुम्हाला माहित आहेत का?

झोपण्यापूर्वी हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, शरीराला होईल मोठे नुकसान…