Vitamin-D : मुलांमध्ये व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे दिसतात ही लक्षणे
व्हिटॅमिन डी हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे मुलांच्या विकासात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे मुले रिकेट्सची शिकार होऊ शकतात. मुलांना यासाठी काही वेळ सकाळी उन्हाळ खेळायला पाठवले पाहिजे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात जाणून घ्या.
Vitamin-D Deficiency : व्हिटॅमिन डी हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक असते. पण जर त्याची कमतरता झाली तर अनेक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. सूर्यप्रकाशात कमीत कमी वेळ घालवल्यामुळे आज अनेकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कार्यांवर परिणाम होतो. लहान मुलांमध्ये याचा अधिक धोका असतो. कारण ती उन्हात जास्त वेळ नसतात.
व्हिटॅमिन डी महत्वाचे का आहे?
तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन डी कॅल्शियमचे योग्य प्रमाण राखण्यास मदत करते. ज्यामुळे रक्त आणि हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता टाळता येते आणि आपली हाडे मजबूत होतात. व्हिटॅमिन डी शिवाय, शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ लागतात.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे थायरॉईडची समस्या देखील उद्भवते. यामुळे हायपोपॅराथायरॉईडीझमची समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे नैराश्य, क्रॅम्प, थकवा इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो.
मुलांमध्ये ही खूप गंभीर समस्या असू शकते. मुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता झाली तर शरीर हाडांमधून कॅल्शियम घेण्यास सुरुवात करते. ज्यामुळे हाडे कमकुवत होऊ लागतात. याशिवाय वाढीस अडथळा निर्माण होऊ शकतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुलांच्या मानसिक विकासातही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे लहान मुलांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता खूपच धोकादायक ठरू शकते.
मुलांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता कशी टाळावी
मुलांना दररोज सकाळी काही वेळेसाठी खेळायला पाठवले पाहिजे. ज्यामुळे त्यांच्या त्वचेतून सूर्यप्रकाश शोषून व्हिटॅमिन डी तयार करू शकेल. खेळत असताना त्यांचा व्यायाम देखील होईल. जे त्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
मशरूम, अंड्यातील पिवळे बल्क, कॉड लिव्हर ऑइल, फॅटी फिश (सॅल्मन, सार्डिन, मॅकरेल इ.) व्हिटॅमिन डी असलेल्या अशा खाद्यपदार्थांचा मुलांच्या आहारात समावेश करा. याशिवाय फोर्टिफाइड खाद्यपदार्थही बाजारात उपलब्ध आहेत, ज्यांचा तुम्ही तुमच्या मुलांच्या आहारात समावेश करू शकता.