दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगू इच्छिता? तर मग या सवयी आजच सोडा, होऊ शकते मोठे नुकसान
चुकीच्या सवयी (bad habits), व्यसनांचा अतिरेक आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी यामुळे अनेक आजारांना निमित्रंण मिळते. चुकीच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे आणि व्यसनांमुळे तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात. ज्यामध्ये मधुमेह, ब्लड प्रेशर, अति लठ्ठपणा, दम लागणे, अस्थमा यासारख्या अनेक आजारांचा समावेश आहे.
चुकीच्या सवयी (bad habits), व्यसनांचा अतिरेक आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी यामुळे अनेक आजारांना निमित्रंण मिळते. चुकीच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे आणि व्यसनांमुळे तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात. ज्यामध्ये मधुमेह, ब्लड प्रेशर, अति लठ्ठपणा, दम लागणे, अस्थमा यासारख्या अनेक आजारांचा समावेश आहे. व्यक्तीला कमी वयात विविध आजारांची लागन झाल्यास त्याचे वयोमान देखील घटते. त्यामुळे जर असे आजार टाळायचे असतील तर सर्वप्रथम तुमच्या लाईफस्टाईलमध्ये (Lifestyle) बदल करणे आवश्यक असते. ज्यामध्ये खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयींचे अनुकरण करणे, जास्त प्रमाणात जंक फूड न खाणे, व्यसनापासून दूर राहणे अशा विविध गोष्टींचा समावेश आहे. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे तुम्ही दीर्घकाळ निरोगी जीवन (Healthy life tips ) जगू शकता? अशाच काही गोष्टींबंद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
अॅक्टिव्ह रहा
तुम्ही स्वत:ला अॅक्टिव्ह ठेवणे अंत्यत महत्त्वाचे आहे. तुम्ही जर अॅक्टिव्ह असाल तर अनेक आजारांपासून तुमचा बचाव होतो. तज्ज्ञांच्या मते तुम्ही तुमचे आरोग्य जपण्यासाठी कितीही आरोग्यदायी अहार घेतला तरी त्याचा तेव्हाच उपयोग होतो, जेव्हा तुम्ही अॅक्टिव्ह असता. तुम्ही जेव्हा अॅक्टिव्ह असता तेव्हा अन्न पचनाची प्रक्रिया अधिक गतीमान होते. त्यामुळे तुमचा विविध आजारांपासून बचाव होतो. तुम्ही स्वत:ला अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे, चालने अशा विविध गोष्टींचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो.
व्यसनांपासून दूर रहा
तुम्हाला जर कोणत्याही गोष्टीचे व्यसन असेल तर आजच सावध व्हा, तंबाखू, सिगारेट या सारख्या गोष्टींच्या अतिरेकी सेवनामुळे तुम्हाला कर्करोग होऊ शकतो. तसेच दारू जास्त पिल्यास तुम्हाला लिव्हरशी संबंधित समस्या उद्भवू शकते. चरस, गांजा यासारखे अमली पादार्थ तुमचे आयुष्य बदबाद करू शकता. व्यसनांचा अतिरेक झाला तर तुम्हाला विविध आजारांची लागण होऊन तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
आरोग्यदायी आहार घ्या
आहारात कोणतीही गोष्ट ही प्रमाणातच असावी, प्रमाणाबाहेर एखाद्या गोष्टीचा समावेश केल्यास ते तुमच्या शरीरासाठी हाणीकारक असते. मांसाहारी पदार्थांमुळे तुमच्या शरीराला विविध पोषण तत्वे मिळतात. मात्र मांसाहीरी पदार्थांचा देखील आहारात प्रमाणातच समावेश करावा. तसेच जंक फूडचे सेवन देखील टाळा. आहारात पालेभाज्या, फळभाज्या यांचा अधिकाधिक समावेश करा.
संबंधित बातम्या
वजन कमी करायचंय?, तर ‘या’ पदार्थांसोबत करा कोरफडीचे सेवन
महिलांनो पेनकिलर्सच्या नेहमी सेवनाने उद्भवू शकतील कानाच्या समस्या, वेळीच व्हा सावधान!
झोपेतून जागे होताच मोबाईल वापरण्याची सवय? भविष्यात गंभीर आजारांना देताय निमंत्रण!